Close Visit Mhshetkari

Home Loan घेताना आकारले जातात हे छुपे चार्जेस! आत्ताच पहा लिस्ट; वाचतील पैसे

Home loan : प्रत्येकाला वाटते आपले स्वतःचे घर असावे.यासाठी आपण सरळ बँकेकडून गृह कर्ज घेतो. गृह कर्ज घेत असताना बँका आपल्याला न सांगता अनेक छुपे चार्ज लावत असतात. कर्ज घेण्या अगोदर अनेक बँका गृहकर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असतात,पण त्या आकारत असलेले शुल्क मात्र आपल्याला अनेक वेळा सांगत नाहीत.

होम लोन घेण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींचा विचार करावा जेणेकरून आपल्याला समोर अडचण येणार नाही याद्वारे तुम्ही सहज करू शकाल की कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घ्यावी आणि कोणते शुल्क आपल्याला बचत करता येते तर बघू या सविस्तर माहिती

गृह कर्जावर आकारले जाणारे शुल्क

ॲप्लिकेशन फी :- माफ करुन घेऊ शकता लोन करतखना ॲप्लिकेशन फी अर्जासह आधीच घेतली जाते. तुमच्या गृहकर्ज अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी आकारले जाते.अर्जाची फीची रक्कम कर्ज मिळो अगर ना मिळो परत केली जात नाही.

तुम्ही बँकेकडे अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा विचार बदलल्यास तुमची फी वाया जाऊ शकते.या फीचा तुम्हाला कर्ज मिळेल की नाही याच्याशी काहीही संबंध नसतो.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे याची खात्री करा. अनेक वेळा बँका हे शुल्क माफही करू शकतात.

मॉर्गेज डीड फी :- होम लोन घेताना तुम्हाला एक मोठे शुल्क द्यावे लागते.सदरील शुल्क पर्सेटेंजच्या रुपात असते.कर्जासाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्काचा हा मोठा भाग असतो. बर्ऱ्याच वित्तीय संस्था होम लोन प्रोडक्ट अधिक आकर्षक बनवण्यासाठी हे शुल्क माफ सुद्धा करतात.

हे पण वाचा ~  Home loan : गृहकर्ज घेऊन नुसते EMI भरत बसू नका! बँकेकडून ही कागदपत्र न चुकता घ्या परत....

सर्च रिपोर्ट :- कोणत्याही बॅंकेकडून मालमत्तेची कायदेशीर स्थिती तपासण्यासाठी वकिलांची नियुक्ती केली जाते.वकील यासाठी फी आकारतात. बहुतेक वित्तीय संस्था सदरील फी ग्राहकांकडूनच घेतात.जर वित्तीय संस्थेने जर प्रॉपर्टीला यापूर्वीच मंजुरी दिली असेल तर हे शुल्क लागू केले जात नाही.

आपण जर मालमत्ता खरेदी करत असाल तर पहिल्यापासून बॅंकेने मंजुरी मिळाली आहे का नाही? तपासून पहा.तुम्ही ही फी वाचवू शकता.

Home loan processing charges

प्रीपेमेंट पेनल्टी :- प्रीपेमें म्हणजे कर्जधारकाने कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आपले कर्ज भरण होय. आपण जर कर्ज अगोदर भरत असू तर बँकांना काही वेळा नुकसान होते, त्यामुळे काही वेळा बॅंकेकडून प्रीपेमेंट चार्जेस आकारले जातात. निरनिराळ्या वित्तीय संस्थांप्रमाणे हे शुल्क निराळे असू शकते.

RBI नुसार फ्लोटिंग रेटवर घेतलेल्या होमलोनवर प्रीपेमेंट पेनल्टी न घेण्याचे आदेश दिलेत.फिक्स्ड रेट होम लोन साठी फ्लॅट रेटवर 2% पर्यंत प्रीपेमेंट पेनल्टी घेतली जाते

कमिटमेंट फी :- बऱ्याच बॅंक किंवा वित्तीय संस्था लोन प्रोसेसिंग आणि कर्ज मंजूर झाल्यावर एका ठराविक कालावधीत कर्ज न घेतल्यास कमिटमेंट फी आकारतात. थोडक्यात वितरित न केलेल्या लोनवर ही फी आकारली जाते.

आपली पगारवाढ झाली ? SIP गुंतवणूक करावी की गृहकर्ज फेडावे? पहा सविस्तर

⬇️

SIP vs Home loan

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment