Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून डीए मध्ये वाढ करण्यासंदर्भात हालचाली सुरू होणार असून लवकरच कर्मचाऱ्यांना माघार भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे.
माहे जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांचा विचार केला असता, सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासुन डी.ए मध्ये 4 % पर्यंतच डी.ए वाढ मिळू शकते.
Dearness Allowance Hike 2024
मिडीया रिपोर्टनुसार साधारणपणे 13 मार्च ते 15 मार्च दरम्यान आचारसंहिता लागू होणार आहे.तत्पूरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरीता महागाई भत्ता मध्ये वाढ करणे, संदर्भात अधिकृत्त निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. थोडक्यात माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्यासोबत वाढीव डीए लाभ मिळणार आहे.
जुलै 2023 पासून 46 % दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे.मात्र याचा रोखीने लाभ ऑक्टोबर 2023 पासून मिळत आहे. यापूर्वी महागाई भत्ता 42 % एवढा होता. विशेष म्हणजे यावेळी यामध्ये आणखी 4 % टक्क्यांची वाढ होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहता महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणे जवळपास सुनिश्चित झाले आहे.आता फक्त याची औपचारिक घोषणा बाकी आहे. तसेच ही घोषणा या चालू महिन्यातच होणार असा अंदाज आहे.
महागाई भत्ता वाढीची घोषणा कधी ?
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकार वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ करते. साधारणपणे जुलै आणि जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढत असते. सरकारने जुलै 2023 चा महागाई भत्ता लागू केला असून, आता जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता प्रलंबित आहे त्यामुळे लवकरच लोकसभा निवडणुकीपूर्वी सदरील वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
केंद्राकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्टमध्ये असे भाकीत वर्तवले जात आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मार्च महिन्यात केंद्रीय कॅबिनेटची एक बैठक होईल,या बैठकीतच महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब केला जाईल असे म्हटले जात आहे.
सदरील महागाई भत्ता वाढीमुळे 48.67 कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि 67.95 पेन्शनर लोकांचा होळीचा सण गोड होणार आहे. अर्थातच या निर्णयाचा एक कोटी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.
महागाई भत्ता थकबाकी सुद्धा मिळणार
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आणखी 4 टक्के % वाढ होणार आहे. अर्थात हा भत्ता 50 टक्क्यांवर जाणार आहे.
विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय जर या महिन्यात घेतला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची अर्थातच जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील दिली जाणार आहे. DA Arrears लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल.