Close Visit Mhshetkari

Guaranteed Pension : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची घोषणा

Guaranteed Pension नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेले असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन संदर्भात एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया

Guaranteed Pension Scheme

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्य सरकारने 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस लागू केलेली आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांचे पैसे शेअर बाजारात गुंतवून त्या आधारे निवृत्तीनंतर पेन्शन दिले जाते. 

सदरील पद्धतीला विरोध म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी आंदोलन पुकारले होते,तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये सुधारणा करण्याची घोषणा करून सदरील आंदोलन मागे घेण्यात मध्यस्थी केली होती.

Family Pension with DA

आता राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मधील बाजारांमधील चढ उठणार निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य सरकार स्वीकारणार आहे.थोडक्यात सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन सरकार देणार आहे.

हे पण वाचा ~  Old pension संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट लिंक पेन्शन बदल्यात आता ..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन योजना सुद्धा लागू केली जाणार असून, 60 टक्के वेतन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.दोन्ही योजनेमध्ये महागाई भत्त्याच्या वाढीचा सुद्धा समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment