Close Visit Mhshetkari

8th Pay Commission : मोठी बातमी आठवा वेतन आयोगा संदर्भात अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा ? केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर ….

8th Pay Commission: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. आपल्याला देशभरामध्ये सातवा वेतन आयोग लागू आहे. व दीड वर्षांनंतर आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. प्रत्येक दहा वर्षानंतर सरकारतर्फे नवीन वेतन आयोग लागू केला जात असतो. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता.

मित्रांनो केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग करणे बाबत तयारी चालू आहे. आर्थिक वर्ष 2024- 25 मध्ये अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाबाबत काही घोषणा केल्या करण्याची दाट शक्यता आहे.

एक कोटीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा

प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्याला आठवा वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. हा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. जॉईन कन्सल्टिव्ह मशिनरी फॉर सेन्ट्रल गव्हर्नमेंट एम्पलॉइजच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या ह्या पत्रामध्ये आठवा वेतन आयोगाची मागणी केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरामध्ये 49 लाख शासकीय कर्मचारी व 68 लाख पेन्शन धारक तुम्हाला सांगायचे झाल्यास साधारणपणे एक कोटीपेक्षा अधिक लोकांना आठवावेतन आयोगाचा फायदा होणार आहे.

23 जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024 25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. गेल्या काही दिवसा पासून आठवा वेतन आयोग स्थापन करावा अशी मागणी करण्यात येत आहे. या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये आठवा वेतन आयोगाबाबत काही घोषणा होणार आहे का? आठवा वेतन आयोग हा मुद्दा समोर येणार आहे का? आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा ~  Employees Gratuity : निवडणुकीच्या धामधूमीत कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! DA वाढीनंतर ग्रॅच्युइटीतही घसघशीत वाढ ...

फिटमेंट फॅक्टरवर ठरणार पगार 

आठवा वेतन आयोगाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार वाढी संदर्भात शिफारस केली जात आहे. यावेळी फिटमेट फॅक्टर मध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचे आयोगातर्फे सांगितले जात आहे. फीडमेट फॅक्टरच्या मदतीने कर्मचाऱ्यांचा पगार पे मॅट्रिक्स ठरवण्यात येतो.

पगार नेमका किती वाढणार?

मित्रांनो तुमचा पगार किती रुपयांनी वाढणार व किती होणार याविषयी काही दिवसा अगोदर फायनान्शियल एका रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 निश्चित केला जाऊ शकते. यानुसार जर वेतन आयोग कर्मचाऱ्यांना मिळाला तर कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपयाची वाढ होऊ शकते त्यानुसार केंद्र कर्मचाऱ्यांचे कमीत कमी मूळ वेतन 18 000 हजार रुपये रुपयांनी वाढवून थेट 26000 हजार रुपये होऊ शकतात.

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन महागाई भत्ता आधी मिळून कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 25 ते 35 टक्क्यांनी वाढ होऊ शकते सातवा वेतन आयोगात 2.57 पट फिटमेंट फॅक्टर निश्चित केला होता. नंतर कमीत कमी मूळ वेतन हे 18 हजार रुपये झाले होते.

Leave a Comment