Fixed Deposit : मित्रांनो गुंतवणुकीचा विचार करायचा झाल्यास मुदत ठेव म्हणजेच एफडी हा देशातील सर्वोत्तम आणि सोपा मार्ग मानला जातो. बँक एफडी मध्ये लोकांना परताव्याची हमी मिळते, तसेच पैसे वाया जात नसून एफडीमध्ये मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक व्याज दिले जाते.
Cumulative and non cumulative FD
मित्रांनो मदत ठेवी विषयी चर्चा करायची झाल्यास त्याचे दोन प्रकार पडतात पहिली म्हणजे क्युम्युलेटिव्ह एफडी संचयी एफडी (Cumulative FD) दुसरी Non Cumulative FD होय.
Cumulative FD :- क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये मुद्दल आणि व्याजाची रक्कम एकत्रित रित्या मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर आपल्याला मिळत राहते.तुम्हाला क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये नियमित व्याज किंवा उत्पन्न मिळत नाही. तुम्हाला मॅच्युरिटीवर सर्व पैसे मिळतील.
Non Cumulative FD :- नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये तुमची व्याजाची रक्कम मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक प्राप्त होते.SBI आणि ICICI Bank यासारख्या अनेक बँका या प्रकारच्या नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी योजना ऑफर करत आहेत . या एफडीमध्ये क्युम्युलेटिव्हच्या तुलनेत व्याज कमी आहे. यामध्ये चक्रवाढ व्याजाचा कोणताही फायदा नाही.तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळत राहतात.
Bank FD New Interest Rates
RBL Bank :- सध्या RBL बँक fd वर जास्त व्याज देत असून बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 120 महिन्यांसाठीच्या ठेवींवर 3.50 % ते 7.80 % व्याज देणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4 % ते 8.30 % पर्यंत व्याज मिळत आहे.ज्येष्ठ नागरिकांना सर्व योजनांवर 0.5% व्याज मिळत आहे.
ICICI Bank :- आयसीआसीआय बँक कडून सामान्य नागरिकांसाठी मुदत ठेवीवर 3% ते 7.10% पर्यंत व्याज दर मिळत आहेत. तर बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.65% व्याजदर मिळत आहे.
सर्वाधिक परतावा 15 महिने-18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सामान्य नागरिकांसाठी 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.65% दर आहेत.थोडक्यात ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिक व्याजदर देत आहेत.