FD Credit Card : एफडी सपोर्टेड क्रेडिट कार्ड हे ग्राहकाच्या एफडीच्या बदल्यात बँकेद्वारे जारी केलेले सुरक्षित क्रेडिट कार्ड असते. क्रेडिट कार्ड जरी करताना आपल्या एफडीतील रकमेचा विचार केला जातो.एखादा ग्राहक फॉल्ट झाला तर बँकेला खात्री मिळते की क्रेडिट कार्ड ची थकबाकी एफडीच्या माध्यमातून आपण पूर्ण करू.
FD supported credit card
सर्वसाधारणपणे बँका ग्राहकाला क्रेडिट कार्डची थकबाकी भरण्यासाठी देय तारखेपासून ६० ते ७५ दिवसांचा कालावधी देतात. तरीही थकबाकी न भरल्यास बँक ग्राहकाच्या एफडीतून पैसे जमा करून घेऊ शकतात.
थोडक्यात नक्कीच रक्कम भरण्यासाठी व करण्यासाठी बँका ग्राहकाकडे असलेल्या एफडी चा वापर करत असते.क्रेडिट कार्ड केवळ निवळ नियमित एफबी साठी दिले जाऊ शकते.
प्राप्तिकर कायद्यांतर्गत कलम ८० सी वजावट मिळणाऱ्या एफडीवर किंवा ऑटो-स्वीप सुविधेसह येणाऱ्या फ्लेक्सी डिपॉझिटवर ही करबचत उपलब्ध नाही.
एफडी समर्थित क्रेडिट कार्डचे फायदे
एफडीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत राहते.
खराब क्रेडिट स्कोअर किंवा अनियमित उत्पन्न असलेल्या ग्राहकांनाही ही कार्डे चांगली सेवा देतात.
क्रेडिट कार्डचा भरला नियमित केला असल्याकारणाने क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत करते.