Close Visit Mhshetkari

NPS Withdrawal Rules : राष्ट्रीय पेन्शन योजना खाते धारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता 1 फेब्रुवारीपासून बदलणार ‘हा’ नियम !

NPS Withdrawal Rules : एनपीएस धारकांसाठी म्हणजे National Pension System योजनेअंतर्गत खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.

पीएफआरडीए (PFRDA) म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 फेब्रुवारीपासून NPS खातेधारकांसाठी खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे.

NPS Withdrawal Rules

आता एमपीएस धारकांना पुढील महिन्यापासून जमा करण्यात येणाऱ्या रकमेपैकी फक्त 25% रक्कम काढता येणार आहे पेन्शन फंड नियमाक व प्राधिकरणाने 12 जानेवारी 2024 रोजी केलेल्या परिपत्रकानुसार एमपीएससी धारकांच्या मुलांचे शिक्षण लग्नाचा खर्च घर खरेदी वैद्यकीय खर्च इत्यादी कारणासाठी फक्त 25 टक्के रक्कम काढता येणार आहे.

सदरील नियम हा 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात येणार आहे याशिवाय तुमच्या स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी सुद्धा आपल्याला एमपीएस खात्यातून पैसे काढता येणार आहे आता आपण एनपीएस खात्यातून पैसे कसे काढावे या संदर्भात माहिती पाहूया. 

How to Withdrawal NPS Amount

एमपीएस खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया काय?

राष्ट्रीय पेन्शन स्कीम अंतर्गत खातेदाराला त्याच्या पगारा जमा होणाऱ्या एनपीएस खात्यातील पैसे काढायचे असल्यास विनंती अर्ज दाखल करावा लागणार आहे. 

हे पण वाचा ~  NPS Changes : अर्थसंकल्पात NPS बदलाचा फटका की फायदा ? पहा 50 हजार पगार असेल तर काय होणार परिणाम? पहा सविस्तर

जर एमपीएससी खातेदार कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर मास्टर परिपत्रकाच्या पॅरा 6(डी) अंतर्गत, अंतर्गत त्याच्या कुटुंबातील सदस्याला पैसे काढण्यासाठी विनंती सबमिट करण्याचा अधिकार आहे.

एमपीएस खात्यातून पैसे काढले काढण्यासाठी खातेदारकाला पैसे काढण्याचे कारण व इतर माहिती द्यावी लागणार आहे त्यानंतर सीआयडी म्हणजे सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी पैसे काढण्याच्या विनंतीची चौकशी करेल आणि समोरील प्रक्रिया पार पाडेल. 

सर्व माहिती बरोबर आढळल्यास काही दिवसात खातेदाराच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात येतात.

National pension scheme

NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी ‘या’ अटींची पूर्तता करणे आवश्यक

  • NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी, तुमचे खाते किमान 3 वर्षे किंवा त्याहून जुने असावे.
  • एमपीएस खात्यातून काढलेली रक्कम खात्यात जमा केलेल्या निधीच्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त नसावी.
  • साधारणपणे एखादा ग्राहक फक्त तीन वेळा खात्यातून आंशिक रक्कम काढू शकतो.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment