Close Visit Mhshetkari

Cardit card : क्रेडिट कार्डच्या नावाखाली बँक आपली फसवणूक करत नाही ना? अशी घ्या काळजी

Cardit Card  :देशात क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढत आहे. क्रेडिट कार्ड हे ग्राहकांना फायदेशीर ठरते. तसेच ते कधी कधी मनस्ताप देणारे पण ठरते. मोठ्या बँकांच नाही तर अनेक छोट्या बँका पण या क्रेडिट कार्डच्या शर्यतीत आहेत. तुम्हाला आठवड्यातून एक ते दोन वेळा बँकांतून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन येत असेल. पण अनेकदा बँका क्रेडिट कार्डच्या अडून एक प्रकारे हप्ता वसूलीच करतात. चूक नसतानाही ग्राहकांकडून शुल्क, दंड वसूल करतात. अशाच एका प्रकरणात SBI Cards And Payment Services ला दणका बसला.

किमान देय रक्कम भरून शांत बसू नका!

जर एखाद्या महिन्यात तुम्ही किमान रक्कम भरत असाल तर सुटकेचानिश्वास सोडू नका. तुम्ही क्रेडिट कार्डाच्या बिल भरण्याच्या कटकटीतून मुक्त झाले आहात, असे समजू नका. हे एकप्रकारच्या कर्जाचे जाळे आहे. कंपनी किमान देय रकमेच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे घेते, जे व्याज आणि फाइल चार्जेसमध्ये वापरले जाते. आणि तुमची मूळ रक्कम तेवढीच राहते.

इतका लागला दंड

दिल्लीतील ग्राहक आयोगाने SBI Cards And Payment Services ला दणका दिला. या शाखेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला. पीटीआयच्या वृत्तानुसार, एसबीआय कार्डसविरोधात एका कार्डधारकाने तक्रार दाखल केली होती. एम. जे. अंथनी यांनी बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.

हे पण वाचा ~  Credit card : काय सांगता ? 2 लाखाची मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड काढा फक्त 10 मिनिटात! ‘इथे’ अर्ज करा...

वाढते कर्जजे लोक क्रेडिट कार्डाने करत असलेल्या खरेदीवर नियंत्रण ठेवत नाहीत त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड धोकादायक ठरू शकते. तुम्ही कर्जाच्या सापळ्यातही अडकू शकता. खरं तर, ग्राहकांना असे वाटते की त्या क्षणी पैसे न खर्च करता ते त्याच्या आवश्यक गरजा आणि अनावश्यक गरजा सहज पूर्ण करू शकतात. हे बिल न भरल्यास तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.

क्रेडिट कार्ड EMI किती महाग पडतो?

तुम्ही क्रेडिट कार्डनेही ईएमआय करू शकता. बर्‍याच वेळा तुम्हाला ईएमआय करण्यासाठी बँकेला कॉल देखील करावा लागतो. लक्षात ठेवा की क्रेडिट कार्डवर ईएमआय केल्याने तुमचे दोन प्रकारचे नुकसान होते.

क्रेडिट कार्डवर ईएमआय केल्याने व्याजाव्यतिरिक्त, तुमच्याकडून प्रक्रिया शुल्क देखील आकारले जाते. दुसरा तोटा म्हणजे रिवॉर्ड पॉइंट्स. ईएमआय केल्यामुळे तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळत नाहीत.

क्रेडिट कार्ड वापरताना अशी घ्या काळजी

Credit card use

Leave a Comment