Close Visit Mhshetkari

Retirement age : मोठी बातमी… राज्य कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीच्या वयात होणार ‘इतकी’ वाढ, मुख्य सचिवांनी केला प्रस्ताव सदर

Retirement age : एका मीडिया रिपोर्ट नुसार,राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून वाढवून 60 वर्ष करण्यासंदर्भात प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला आहे.

Employee Retirement Age

सन 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहे.सदरील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे फडणवीस पवार सरकार निश्चितच हा निर्णय घेऊ शकते असे काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही तिकडी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करून राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करते का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभागाने देखील प्रस्ताव सादर केला होता,परंतु या प्रस्तावाला अतिरिक्त मुख्य सचिवांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबीत आहे.

हे पण वाचा ~  Retirement age : पहा आपल्या गावातील अंगणवाडी सेविका कधी होणार रिटायर्ड! नवीन नियम आला ...

पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना चौदा लाखापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो. राज्यात 60 हजार कर्मचाऱ्यांसाठी सरकारवर दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो.तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते.निवृत्तीचे वय 60 केल्यास सरकारचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 17 लाख आहेत. दरवर्षी 3% कर्मचारी निवृत्त होतात.राज्य सरकारी सेवेत नोकरीसाठी, कमाल वयोमर्यादा 31 ते 43 वर्षे इतकी आहे.राज्य कर्मचाऱ्यांना नोकरीसाठीचा कार्यकाल कमी मिळतो.

3 thoughts on “Retirement age : मोठी बातमी… राज्य कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीच्या वयात होणार ‘इतकी’ वाढ, मुख्य सचिवांनी केला प्रस्ताव सदर”

  1. सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करू नका . उलट आणखी तीन वर्षे कमी केले तरी चालतील.

    Reply

Leave a Comment