DA Hike : आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्तेत वाढ करण्यास मंजुरी दिल्यानंतर पेन्शन धारक व सरकारी कर्मचारी यांच्या ऑक्टोबरच्या पगारात सदरील वाढ मिळण्याची शक्यता आहे.
DA Hike Central Employees
केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी भेट दिली आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावात मंजुरी देण्यात आली आहे. आता महागाई भत्त्यात 4 % वाढ करून तो 42 टक्क्यांवरून 46 % करण्यात आला आहे.
पगार किती वाढणार हे समजून घ्या
DA वाढीनंतर केंद्रीय कर्मचार्यांच्या पगार वाढबद्दल बोलायचे झाले तर एखाद्या कर्मचार्याला मूळ वेतन १८ हजार रुपये मिळत असेल, तर कर्मचार्याचा महागाई भत्ता सध्या ४२ % दराने ७,५६० रुपये असेल तर आता 4 टक्के वाढीनंतर महागाई भत्ता ८,२८० रुपये होईल. म्हणजेच थोडक्यात त्यांच्या पगारात थेट ७२० रुपयांची वाढ होणार आहे.
महागाई भत्ता दरवाढ प्रेस नोट येथे पहा