Close Visit Mhshetkari

Anukampa Selection : अनुकंपा भरती संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित; आता या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार लाभ ….

Anukampa Selection : महानगरपालिका / नगरपरिषदा/ नगरपंचायतमधील दि.२७.०३.२००० पूर्वी रोजंदारीने कार्यरत कर्मचारी ज्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे.समावेशनाकरीता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरीता विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत.

समावेशनासाठी महानगरपालिका/नगरपरिषदा/ नगरपंचायत पात्र होते.समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झाल्याने त्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने प्रस्ताव सादर केला होता.

अनुकंपा नियुक्ती योजना पात्र कर्मचारी

सामान्य प्रशासन विभागाचा अनुकंपा नियुक्ती योजनेबाबतचा सर्वसमावेशक सूचनांचे एकत्रिकरण असलेला शासन निर्णय दि.२१.०९.२०१७ राज्यातील महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) / नगरपरिषदा/ नगरपंचायतींना खालील फेरफारासह / सुधारणांसह लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगरपरिषद / नगरपंचायतींमधील खालील प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू राहील

१. नगरपरिषद / नगरपंचायतीतील आस्थापनेवर काम करणारे स्थायी / अस्थायी कर्मचारी.

२. ज्या कर्मचाऱ्यांची नगरपरिषद / नगरपंचायत सेवेत गट-क किंवा गट-ड मध्ये विहीतरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे व ते नगरपरिषद / नगरपंचायतीच्या आस्थापना सूचीवर आहेत.

३. जे कर्मचारी नगरपरिषद / नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दि.२७.०३.२००० पूर्वी कार्यरत होते व त्यांना शासन / नगरपरिषद प्रशासन संचालनालय / विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेशाने सेवेत सामावून घेवून नियुक्ती देण्यांत आली आहे, असे कर्मचारी.

४. ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत मा. कामगार न्यायालय / मा. औद्योगिक न्यायालय / मा. उच्च न्यायालय/ मा. सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशाने त्यांना नगरपरिषद / नगरपंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन / नगरपरिषद प्रशासन संचालनालय / विभागीय आयुक्त यांनी पदनिर्मितीस / त्यांना सामावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी,

५. नगरपरिषद / नगरपंचायती सेवेत नियमित केलेले परंतु, अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले कर्मचारी,

६. तत्कालीन ग्रामपंचायतींमधील कार्यरत विहीत अर्हता धारण करणारे व मंजूर पद उपलब्ध असताना केवळ समावेशन प्रक्रीया पूर्ण न झाल्याने / प्रशासकीय कारणामुळे नवनिर्मित नगरपरिषदा/नगरपंचायतींमध्ये समावेशन होण्यापूर्वी मयत झालेले पात्र कर्मचारी

७. जे कर्मचारी नगरपरिषदा/ नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दि. २७.०३.२००० पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच, समावेशनाकरीता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरीता विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी नगरपरिषदा/ नगरपंचायत पात्र होते तथापि, समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी.

हे पण वाचा ~  Retirement Gratuity : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीनंतर आता ग्रॅच्युइटीत केली 7% वाढ ! पहा सविस्तर  ..

८. उक्त नमूद ६ व ७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र वारसास अनुकंपा नियुक्ती देताना दिवंगत कर्मचारी समावेशनास पात्र असताना, संबंधित प्रकारचे पद मंजूर असताना केवळ प्रशासकीय बाबीमुळे त्याचे समावेशन झाले नसल्याचे संबंधित मुख्याधिकारी यांनी अभिलेखावर प्रमाणित करणे आवश्यक राहील.

९. अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत नगरपरिषद / नगरपंचायतमधील कर्मचा-यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधीका-याकडे अर्ज करण्याची अट उक्त नमूद ३,६ व ७ मधील कर्मचा-यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्ष गृहीत धरण्यात यावा.

अनुकंपा तत्वावर प्रतिक्षासूची कार्यवाही

१. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या जिल्ह्यातील महानगरपालिका / नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसास या योजनेतंर्गत नियुक्ती देण्यासाठी गट-क व गट-ड करीता स्वतंत्र प्रतिक्षासूची ठेवावी.

२. संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना/ पाल्याना योजनेची माहिती देऊन, नियमावलीतील नियमानुसार प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन, परिपूर्ण प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवावा.

३. जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित पात्र वारसाचे नाव प्रतिक्षायादीत समाविष्ट करावे.

४. सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.४ येथील दि.२६.०८.२०२१ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपध्दती लागू राहील.

महानगर पालिका कर्मचारी अनुकंपा नियुक्ती योजना 

अनुकंपा नियुक्ती योजना लाभ महानगरपालिकेच्या खालील कर्मचाऱ्यांना लागू राहील.

१. महानगरपालिकेच्या रुपांतरीत स्थायी व अस्थायी आस्थापनेवरील महानगरपालिका कर्मचारी.

२. सेवा नियमित केलेल्या परंतु, अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले महानगरपालिका कर्मचारी.

३. जे कर्मचारी महानगरपालिका सेवेत रोजंदारीने दि.२७.०३.२००० पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती हि प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरिता संबंधित प्रकारच्या पदाकरिता विहित शैक्षणिक अर्हता धारण करीत आहे आणि समावेशनासाठी पात्र आहेत. तथापि, समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी.

महानगरपालिका अनुकंपा नियुक्ती शैक्षणिक अर्हता

१. गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या पदांवर संबंधित सेवाप्रवेश नियमांतील विहीत शैक्षणिक अर्हता असल्यास, अशी नियुक्ती देता येईल.

२.जेथे महानगरपालिकाचे स्वतःचे सेवा प्रवेश नियम विहीत नाहीत अशा प्रकरणी शासनाकडील समकक्ष पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार विहीत शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.

Leave a Comment