Bakshi Samiti : राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालातील वेतनश्रेणीविषयक शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबातचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग, वेपूर- ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि.१३.०२.२०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.
सदरील निर्णयानुसार राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करुन एकूण १०४ संवर्गाना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत.
राज्य वेतन सुधारणा समिती वेतननिश्चिती
ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक (निम्नश्रेणी) व विस्तार अधिकारी या सवंर्गांना सुधारित वेतनश्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत.
शासन परिपत्रकान्वये वित्त विभागाकडून वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.सदर स्पष्टीकरणात्मक सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) व विस्तार अधिकारी या संवर्गाना लागू करण्याचा संदर्भात प्रस्ताव शासन परिपत्रक प्रसृत करण्यात आले आहे.
Bakshi samiti ahaval khand 2
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम २४८ च्या परंतुकानुसार अनुज्ञेय असलेल्या अधिकारानुसार वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. वेपुर- ११२३/प्र.क्र.५/सेवा-९, दि. २२ फेब्रुवारी, २०२४ राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) व विस्तार अधिकारी या संवर्गाना योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात येत आहे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.