Earned Leave : अंशदायी निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचारी सेवानिवृत्त / राजीनामा / नोकरी सोडल्यास /निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) (सुधारणा) नियम 2016 मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
अर्जित रजा रोखीकरण शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2005 पत्रानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजीच्या शासन निर्णयान्वये 2005 नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व नियत वयमान सेवानिवृत्ती/ मृत्यू इ.कारणाने कर्मचाऱ्यांची शासकीय सेवा समाप्त झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासन स्तरावरुन योग्य कार्यवाही होण्यासंदर्भात सुचना करण्यात आलेली आहे.
शासन निर्णयातील परिच्छेद 5 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की,1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन DCPS योजना लागू केली होती, परंतु याचे रुपांतर करण्यात येऊन राष्ट्रिय पेन्शन योजनेत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा योजनेत असलेल्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजनेचा सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्तीवेतन योजनेमध्ये समावेश नाही.
Earned Leave Incashment
सदरील शासन निर्णयान्वये 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्ती होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 लागू होणार नसल्याबाबत कोणतेही आदेश निर्गमित करण्यात आले नाही.
परिणामी सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 जसेच्या तसे लागू आहे.थोडक्यात NPS/DCPS धारक कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार आहे.