Retirement Benefits : राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर जे महत्वाचे लाभ मिळत असतात. यांमध्ये पेन्शन, निवृत्ती वेतन अंशरोखिकरण, रजा रोखीकरण,ग्रॅज्युटी,गटविमा,पीएफ या गोष्टींचा समावेश असतो.
रिटारमेंट नंतर सर्व लाभ कोणत्या कर्मचाऱ्याला मिळणार ? किती कसा मिळणार ह्या संदर्भातील बरेच प्रश्न सरकारी कर्मचार्यांच्या मनात असतात.सेवानिवृत्ती नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हि रक्कम उपयोगी पडणारी असते.सेवानिवृत्ती नंतर कार्यालयात सहकार्य केले जात नाही. चला तर पाहुयात सविस्तर माहिती.
Retirement Benefits Calculator
ग्रॅज्युएटी (Gratuity) : कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस साधारणपणे 14 लाखापर्यंत ग्रॅज्युटी रक्कम दिली जात असते. आता ग्रॅज्युएटीची रक्कम रक्कम 20 लाख रुपये करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून जोर धरू लागली आहे.
पेन्शन विक्री (Commutation Of Pension) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती नंतर आपल्याला ५०% पेन्शन मिळते हा आपला समज असतो,पण आपल्याला आपली पेन्शन विक्री करावी लागते.निवृत्ती नंतर Commutation Of Pension किंवा पेंशन विक्रीची एक मोठी रक्कम निवृत्ती नंतर मिळत असते.
गट विमा (Group Insurance) :- राज्य कर्मचारी गट विमा योजना,१९८२ नुसार लागू विमा योजनेद्वारे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याला विमा संरक्षण मिळत असते. कर्मचाऱ्याला आपली सेवा संपल्यानंतर सदरील रक्कम व्याज आणि मुद्दलसह परत मिळते.
भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) : ‘भविष्य निर्वाह निधी’ हा कर्मचाऱ्यांसाठी असलेला एक प्रकारचा ‘निवृत्ती निधी’ असतो.सरकार यावर व्याज देते. सेवानिवत्तीनंतर सर्व रक्कम परत मिळते.
राज्य कर्मचारी हा नोकरीत असतांना भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा असणाऱ्या रकमेचा काही भाग काही विशिष्ट कारणांसाठी उचल म्हणून घेऊ शकतो.अपत्यांचे लग्न अथवा घरबांधणी आदींसाठी जमा रकमेच्या ठराविक प्रमाणात अशी उचल करता येते.
अर्जित रजेचे रोखीकरण (Earned Leave Incashment ) :- महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभाग 1996 चा शासन निर्णय व महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ चे नियम ६८ नुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर मुळ सेवापुस्तिकेनुसार अर्जित रजेच्या खाती शिल्लक असलेली अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळतो.साधारणपणे ३०० रजापर्यंत रोखिकरण लाभ मिळत असतो.
निवृत्ती वेतन (Family pension) :- सन २००५ पुर्वी सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ प्रमाणे निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन योजनेचा लाभ मिळतो.
Pension Benefits Calculator
आपण आता पेन्शन बेनिफिट कॅल्क्युलेटरच्या मदतीने घरी बसून कर्मचार्यांना त्यांना मिळणारी पेन्शन,रजा रोखीकरण रक्कम किती मिळते पाहणार आहोत.
आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व आपली माहिती अचूक भरावी.
- प्रथम आपले शेवटचं BASIC टाका.
- प्रथम नियुक्ती दिनांक (JOINING DATE)
- सेवा निवृत्ती दिनांक (RETIREMENT DATE)
- सध्या लागू असलेला महागाई भत्ता टाकावा (DA)
- आपल्या शिल्लक अर्जित रजा टाका.
- शेवटी GO BUTTON वर क्लिक करावे
सेवानिवृत्ती नंतर किती निवृत्तीवेतन,अर्जित रजा रोखीकरण रक्कम मिळणार येथे पहा
मित्रांनो आपलयाला माहिती आहे की,राज्य सरकारी कर्मचाऱ्याना नवीन वेतन आयोग लागू होत असतात. नवा वेतन आयोग लागू झाल्यावर वरील लाभ कर्मचाऱ्याना निवृत्ती नंतर सुध्दा मिळत आहे.
Desclemer : सदरील कॅल्क्युलेटर वर ९९% माहिती खरी आणि खात्रीशीर दाखविण्यात आली आहे.एखाद्या वेळेस यामध्ये तफावत असू शकते.सदरील माहिती प्रमाणित आहे असे समजू नये किंवा प्रमाणित आहे असा दावा आम्ही करत नाही.