Salary account : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंट संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून आता सरकारी कर्मचाऱ्यांचे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पगार खालील बँकेत करण्यासंदर्भात सूचना शासन निर्णय अन्वये देण्यात आल्या आहेत तर बघूया काय आहे सविस्तर माहिती
या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बँकेत होणार बदल
बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन युनियन बैंक ऑफ इंडिया मार्फत अदा करण्याबाबत दिनांक २८ मार्च, २०१८ व दिनांक ४ एप्रिल, २०१८ शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे.
बृहन्मुंबईतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दरमहाचे वेतन वितरीत करण्यासाठी अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (दक्षिण/उत्तर/पश्चिम) यांचे मेन पुल अकाऊंट एक वेळची विशेष बाब म्हणून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित मध्ये उघडण्यास सन २०२३-३४ या वित्तीय वर्षासाठी मान्यता देण्यात आली आहे.
Salary account new rules
बृहन्मुंबईतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २९ ऑगस्ट, २००५ व दिनांक ७ एप्रिल, २००८ अन्वये विहीत केलेली कार्यपध्दती व इतर अटी व शर्ती जशाच्या तशा लागू राहणार आहे.
सदर अटी व शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने करावी असे निर्देश देण्यात आले आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांनी याबाबत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेशी आवश्यक तो करारनामा तात्काळ करण्याची कार्यवाही करावी, याबाबत शिक्षण निरीक्षक (दक्षिण/उत्तर/पश्चिम), मुंबई यांचे मेन पूल अकाउंट (पार्कीग अकाउंट) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तात्काळ उघडण्यात येणार आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२०५१७२३२३८८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
Kareem Dickerson