Close Visit Mhshetkari

Central Employees : संसदेतून सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोग संदर्भात महत्त्वाची माहिती समोर! पहा सविस्तर..

Central Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत lमहत्त्वाची माहिती भारताच्या संसदेतून आलेली असून आठव्या वेतन आयोगासंदर्भात माननीय खासदारांनी अर्थ राज्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नातून आठव्या वेतन आयोगा व इतर बाबीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर आलेले आहे.तर बघूया सविस्तर

8th Pay Commission Updates

राज्यसभेतील तारांकित प्रश्न क्रमांक 395 अंतर्गत दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी श्री रामनाथ ठाकूर यांनी आठवा वेतन आयोगासंदर्भात आज प्रश्न विचारलेला होता याचे स्पष्टीकरण माननीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेले असून त्यानुसार आठव्या वेतन आयोगा व इतर बाबीचा सामावेश आहे.

आठव्या वेतन आयोगाबाबत माहिती संसद सदस्य श्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024/ 17 माघा, 1945 (सका) रोजी अर्थमंत्र्यांना यांनी तारांकित प्रश्नाद्वारे माहिती विचारली होती.

प्रश्न : –

(a) 7th Pay CPC च्या पॅरा 1.22 च्या मान्यतेचा विचार न केल्याची फाइल्सवर नोंद केलेली कारणे काय आहेत?

हे पण वाचा ~  7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे गिफ्ट! पगारात होणार 8 हजाराची वाढ ?

(b) सरकार वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन आहे का?

(c) तसे असल्यास, अशा परिस्थितीचे तपशील आणि कारणे काय आहेत?

(d) नसल्यास, पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन का करत नाही आणि गेल्या तीस वर्षांत अभूतपूर्व महागाईचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा का करत नाही?

वित्त मंत्रालयातील राज्यमंत्री (श्री पंकज चौधरी) यांनी दिलेले उत्तर खालील प्रमाणे आहेत.

उत्तर : –

(a): 7th Pay CPC वर आधारित वेतन आणि भत्त्यांच्या सुधारणेला मंजुरी देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने या मुद्द्यावर विचार केला नाही.

(b) ते (d): असा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

Leave a Comment