Close Visit Mhshetkari

Diwali Bonus : आनंदवार्ता! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?

Government Employees Diwali Bonus:

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणली असून सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे केंद्र सरकारने मंगळवारी 2022 23 वर्षासाठी राजपात्रित अ, ब कर्मचाऱ्यांसाठी नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस जाहीर केला आहे. यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाणार आहे.

कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?

सदरील बोनसचा विचार करायचा झाला तर राजपात्री अधिकारी गट ब आणि गट क मध्ये मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो आहे हे असे कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रोडक्ट पोलिटी लिक्विड बोनस स्कीम मध्ये समाविष्ट नाहीत.केंद्रीय निमलष्करी दलातील (Paramilitary Forces) कर्मचाऱ्यांनाही Adhoc Bonus चा लाभ मिळतो. याशिवाय हंगामी कर्मचारीही याच्या कक्षेत येतात.

कसा ठरवला जातो बोनस?

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या सरासरी आधारावर सदरील रक्कम दिली जाते साधारणपणे 30 दिवसांचा मासिक म्हणून सुमारे एक महिन्याच्या पगार इतका असतो. तर उदाहरण बघायचे झाल्यास जर आपला पगार 18000 असेल तर तीस दिवसाचा बोनस म्हणजे 17 हजार 763 रुपये इतका आपल्याला मिळणार आहे.रु 7000*30/30.4 = रु. 17,763.15 (रु. 17,763).

हे पण वाचा ~  State employees : महत्वाची बातमी; जुनी पेन्शन अभ्यास समिती सेवानिवृत्ती वय 60 वर्षे संदर्भात देणार 'हा' अहवाल?

सदरील बोनस चा फायदा 31 मार्च 2023 पर्यंत सेवेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार असून 2022-23 वर्षाच्या किमान सहा महिन्यात ड्युटी केलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.एडहॉक बेसवर नियुक्त केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनाही हा बोनस मिळणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनी सलग सहा महिन्यांची सर्विस केलेली असावी, त्यांच्या सर्विसमध्ये कोणताही खंड असू नये, अशी अटकी घालण्यात आलेली आहे.

मोदी सरकारकडून बोनस जाहीर

आपल्याला माहिती असेल की नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सुरू होणारा असून सरकारी कर्मचाऱ्यांना यासाठी आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आलेली आहे.आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चार टक्के महागाई भत्ता वाढण्याच्या बातमीला सुद्धा दुसरा मिळत आहे. त्यामुळे एका प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment