7th pay arrears : सातवा वेतन आयोग थकित हप्ता, मेडिकल बील ऑनलाईन दाखल करण्या संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित ….

7th pay Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आलेले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा पहिला,दुसरा आणि तिसरा हप्ता ऑनलाईन देखा मध्ये काढण्यासंदर्भात मार्ग मोकळा झालेला आहे. तर काय आहे परिपत्रक पाहूया सविस्तर

Online Medical bill update

मा.शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक शिसंमापु/शिक्षक-शिक्षकेत्तर/ टि-५-६/२३-२४/६२६७, दिनांक २०/१२/२०२३

नुसार माहे डिसेंबर २०२३ चे ऑनलाईन देयक सातवा वेतन आयोगाच्या तिराऱ्या हप्त्यासह मेडिकल बिल सुद्धा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी च्या बिलामध्ये अदा संदर्भात निर्देश प्राप्त झाले आहे.

शालार्थ प्रणाली मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता अदा करण्याकरीता तसेच वैद्यकीय देयके अदा करण्याकरीता टॅब उपलब्ध करुन देणे बाबत सूचना आज श्री. पवन जोशी, बिझनेस अनालिस्ट,महाआयटी, मुंबई यांना देण्यात आले आहे.

हे पण वाचा ~  Salary hike : खूशखबर .. या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू !शासन निर्णय निर्गमित ..

 

सातवा वेतन आयोग थकित हप्ता

उपरोक्त विषयाबाबत लेखाशिर्ष २२०२०१८२/३६, २२०२००४८/३६ व २२०२३७०८/३६ अंतर्गत शालार्थ प्रणाली मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता अदा करण्याकरीता तसेच वैद्यकीय देयके अदा करणेसाठी माहे डिसेंबर २०२३, जानेवारी २०२४ व माहे फेब्रुवारी २०२४ या महिन्या करीता टॅब उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Leave a Comment