DA Calculator : आनंदाची बातमी ….. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ; पहा किती किती वाढणार पगार आणि किती मिळेल फरक

DA Calculator : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता सरकारकडून वाढवण्यात आलेला आहे.

आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती मिळणार आणि त्याचा फरक कसा मिळणार (da calculator) याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

DA Hike Calculator

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

दिनांक १ जानेवारी, २०२५ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५३% वरुन ५५% करण्यात आला आहे.

महागाई भत्ता फरक मिळणार !

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२५ ते दिनांक ३१ जुलै, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह  (DA arrears ) माहे ऑगस्ट, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल.

हे पण वाचा ~  DA Hike 2024 : मोठी बातमी ! महागाई भत्ता वाढी संदर्भात नवीन आकडेवारी समोर; DA मध्ये होणार मोठी वाढ; पहा डेटा ..

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे, त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. 

खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षांखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८११११२२०३७३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

पहा महागाई भत्ता फरक किती मिळणार ➡️ DA Calculator

Leave a Comment