7th Pay DA hike : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना खुशखबर दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हा महागाई भत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नसून पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात दिवाळीपूर्वी मिळणार आहे,तर काय आहे बातमी पाहूया.
7th Pay DA Allowance Hike
ऑक्टोबर महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये घसघशीत वाढ करण्यात येणार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ केली जाईल.
ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्ता (Dearness Allowance) 4% वाढ होण्याची दाट शक्यता आहे.मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे याच्यामध्ये चार टक्के वाढ करून 54 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.
Dearness Allowance hike
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022 मध्ये 28 सप्टेंबर रोजी चार टक्के देवाड केली होती तेव्हा 24 ऑक्टोबरला दिवाळी होती. आता यावर्षीचा विचार करायचा झाल्यास 12 ऑक्टोबर रोजी दसरा, तर 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डीए वाढवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकाच्या महागाई भत्त्यात जुलै 2024 पासून सदरील डीए वाढ देण्यात येईल. सोबतच महागाई भत्त्याचा फरक सुद्धा मिळण्याची शक्यता आहे कारण अनेक राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातलेले आहेत.
DA ’54’ टक्के झाला तर किती होईल फायदा ?
आपला जर 18 हजार पगार असेल तर, 54 % महागाई भत्त्यानुसार 720 रुपये पगार वाढेल.आपले वेतन दर 25 हजार रुपये असेल, तर जवळपास 1000 रुपयांचा पगार वाढ आपल्याला मिळणार आहे.याशिवाय 35 हजार मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1400 रुपयाची वाढ होणार आहे.