Bonus for employees : नमस्कार मित्रांनो मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी तब्बल 26 हजार रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. तसेच जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये मेडिक्लेम देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दिवाळीला २६ हजार रुपये मिळणार बोनस!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचारी संघटना यांच्यामध्ये बैठक पार पडली असून पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला असला तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की मागील वर्षी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 22 हजार पाचशे रुपये बोनस देण्यात आला होता यावेळी पुढील वर्षी बोनस मध्ये वाढ होणार नाही अशी घोषण करण्यात आली होती. यामुळे यंदा पुन्हा २२ हजार ५०० इतका बोनस दिला जाईल अशी अपेक्षा होती.
BMC employees update
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.आरोग्य सेविकांना गेल्या वर्षी ९ हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्यात वाढ करून ११ हजार रुपये इतका बोनस देण्यात येणार आहे. या बोनासमुळे पालिकेला २६० कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
या समुहामुळे समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक वत्सल उन्नती व्हावी हीच सदिच्छा.