Provident Fund : पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! मिळणार वाढीव व्याजदर; जाणून घ्या नवीन व्याजदर व सविस्तर अपडेट्स

Provident Fund : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय कामगार मंत्रालय आर्थिक वर्ष २०२३ साठी पीएफ सदस्यांना एकूण 8.15 % व्याजदर देण्याच्या दिशेने काम करत आहे. 

विशेष म्हणजे 24 कोटी खातांमध्ये 8.15 % व्याजदराने रक्कम दिलेली असून ईपीएफओ व्याजदराबाबत सरकार योग्य दिशेने पावले टाकत असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितलं आहे, तसेच सरकार समाधानी असल्याचेही ते म्हणाले.

EPF new interest rate

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३४ वी बैठक मंगळवारी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी पार पडली. दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत बोर्डाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी EPFO चा वार्षिक अहवाल मंजूर केला आहे. हा अहवाल संसदेत सादर करण्याची शिफारस सरकारला केली जाणार आहे.

हे पण वाचा ~  PF Calculation : कर्मचाऱ्यांचे वय 25 वर्ष ,बेसिक सॅलरी 25 हजार रुपये; तर रिटायरमेंट फंड किती मिळणार? कॅलक्युलेशन समजून घ्या

EPFO च्या ७१ व्या स्थापना दिनी कॅबिनेट मंत्र्यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम ग्राहकांच्या खात्यात योग्यवेळी आणि योग्य व्याजासह हस्तांतरित करणे यावर भर दिला आहे. 

भविष्य निर्वाह निधी संघटन

सन २०२२-२३ मध्ये एकूण भविष्य निर्वाह निधी योगदान २.१२ लाख कोटी रुपये आहे, तर मागील वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये ही रक्कम १.६९ लाख कोटी रुपये होती.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये EPFO चा एकूण गुंतवणूक निधी २१.३६ लाख कोटी रुपये आहे, यामध्ये पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी या दोन्ही रकमेचा समावेश आहे. गेल्या वर्षी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ही रक्कम १८.३ लाख कोटी रुपये होती.

Leave a Comment