Close Visit Mhshetkari

Income Tax Notice : ‘हे’ 5 प्रकारचे व्यवहार जर आपण करताय तर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!

Income Tax Notice : आपल्या पगाराव्यतिरिक्त इतर माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील मिळतो जो आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्दिष्ट केले गेला आहेत.

आता करपात्र वर्गवारीतील प्रत्येक उत्पन्नाची माहिती उपलब्ध होणार आहे.त्यामुळे आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Income tax New Rules 2023

इन्कम टॅक्स विभागाच्या नवीन एआयएस पद्धतीनुसार आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहाराची जसे म्युच्युअल फंड , सोसायटीचा व्यवहार असेल किंवा बँकेत जमा होत असते.याची माहिती एकत्रितरित्या पाहायला मिळणार आहे.त्यामुळे एक प्रकारे आयकर भरणाऱ्यांसाठी हे एक अतिशय उपयोगी आणि पारदर्शक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मालमत्तेची खरेदी किंवा विक्री

प्रॉपर्टी रजिस्ट्रारला 30 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या स्थावर मालमत्तेची कोणत्याही गुंतवणूकिची किंवा विक्रीची माहिती टॅक्स अधिकाऱ्यांना द्यावी लागते.रिअल इस्टेट मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करताना करदात्यांना आपल्या कॅश ट्रान्सझॅक्शनची माहिती Income Tax फॉर्म 26AS मध्ये द्यावी लागेल. 

हे पण वाचा ~  ITR returns : आयकर रिटर्न संदर्भात मोठी बातमी! आता असा तपासा आपले स्टेट्स

बचत खाते ठेव (Bank Cash deposit)

 बँक बचत खात्यामध्ये रोख रुपये जमा करण्याची मर्यादा 10 लाख रुपये असते.जर आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याला आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते.चालू खात्यांमध्ये ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे.

शेअर्स मार्केट व म्युच्युअल फंडस् गुंतवणूक

शेअर्स मार्केट,म्युच्युअल फंड,स्टॉक,बाँड किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपले कॅश व्यवहार एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

CBDT नियमांनुसार,जर आपल्या क्रेडिट कार्डचे बिल आपण 1 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचे पेमेंट केले तर तर Income Tax विभागाच्या कक्षेत येते.याशिवाय,क्रेडिट कार्ड बिल सेटल करण्यासाठी आर्थिक वर्षात 10 लाख किंवा त्याहून जास्त पैसे भरल्यास ते कर विभागाकडे उघड केले पाहिजे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Income Tax Notice : ‘हे’ 5 प्रकारचे व्यवहार जर आपण करताय तर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!”

Leave a Comment