Close Visit Mhshetkari

Anti Corruption Bureau Bharti : लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पदवीधर उमेदारांसाठी मोठी भरती; लगेच येथे करा अर्ज ..

Anti Corruption Bureau Bharti : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विधि अधिकारी गट-ब पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भरती

  • पदांचे नाव: विधि अधिकारी गट-ब
  • रिक्त जागा संख्या: 08
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर
  • पगार: रू. 28,000/- दरमहा

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.विधि अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.

How to apply Anti Corruption Bureau Bharati

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2024

हे पण वाचा ~  Government jobs : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

ऑफलाईन – मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर.

अर्जाची फी :- खुला वर्ग : रू. 100/-

मागासवर्ग :- नाही

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नोकरी 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाची स्थापना 1960 मध्ये झाली. या विभागाची प्रमुख जबाबदारी भ्रष्टाचार रोखणे आणि भ्रष्टाचारी व्यक्तींवर कारवाई करणे आहे.

लाचलुपत विभागात विधि अधिकारी गट-ब हे एक महत्त्वाचे पद आहे. सदरील पदावरील अधिकारी भ्रष्टाचाराच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावतात. परिणामी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी, सेवा, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे आणि तुम्ही भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करू इच्छिता, तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.अधिक माहितीसाठी कृपया https://acbmaharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळवर जाहिरात पाहावी.

Leave a Comment