Close Visit Mhshetkari

Agriculture University : मोठी बातमी… राज्यांतील या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष ? मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय …

Agriculture University : कृषी विद्यापीठांमधील अध्यापक वर्गाच्या निवृत्तीचे वय आता ६० वर्षे करण्यात आले आहे.मित्रांनो निवृत्ती वयाबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. आता तो संपुष्टात आला आहे.महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत सदरील निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अपडेट्स

मित्रांनो कृषी विद्यापीठातील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वरून 60 वर्षे करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्याबाबत 2015 मध्ये घेण्यात आला होता.

कृषी खात्याने निवृत्ती कालावधीचा अभ्यास करण्याची लेखी सूचना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तत्कालीन महासंचालक विश्वजीत माने यांना दिल्या होता. परंतू महासंचालकांचा अहवाल अनेक दिवस धुळ खात पडला होता.

सदरील पदांची सध्याची निवृत्ती वयोमर्यादा सध्या ६२ आहे. आता वयोमर्यादा दोन वर्षांनी कमी केल्यामुळे राज्य शासनाला तत्काळ काही वाढीव खर्च करावा लागेल. जसे की,निवृत्त्ती वेतनापोटी आगाऊ निधी अदा करावा लागेल.

Agriculture University Vacancy

 कृषी विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख,सहयोगी अधिष्ठाता,शारीरिक शिक्षण निदेशक, क्रीडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यांमध्ये समावेश आहे.

सध्या राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक संवर्गातील मंजूर पदे 2 हजार 319 असून यामधील सुमारे 1 हजार 100 पदे सध्या रिक्त आहेत. आता वयोमर्यादा 62 वरून 60 झाल्यास आणखी सुमारे 150 पदे एकाच दिवशी सेवानिवृत्त होणार आहे.

देशामध्ये गुजरात,मध्यप्रदेश,छत्तीसगड, बिहार व इतर काही राज्याचा विचार केला तर या ठिकाणी कृषी शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा 65 वर्षे आहे.

जाणकार प्राध्यापक काय म्हणतात…

निवृत्तीची मर्यादा कमी केल्यास पदे लवकर रिक्त होतील व त्यातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल.मात्र, जुनी प्राध्यापक मंडळी या निर्णयामुळे अस्वस्थ आहेत.

सेवा वयोमर्यादा कमी केल्यामुळे राज्यातील उच्चशिक्षित वर्गाला संधी निर्माण होऊन नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यास अनुकूल स्थिती प्राप्त होईल ;असे काही जाणकार प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment