Advanced Salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली असून रमजान व डॉ.आंबेडकर जयंती च्या मुहूर्तावर मार्च महिन्याचा पगाराचा संदर्भात नवीन अपडेट्स आले आहे. आता या महिन्याचा पगार लवकर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
Salary Budget of March
मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना दि.19 मार्च 2024 रोजी रजनी रावडे
प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च 2024 चे वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करणेबाबत सूचना केली आहे.
श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव यांचे क्र. अभाऊशिस/रा का/२०२४/१३१०/ईद पूर्वी वेतन, दि.१८.०३.२०२४ रोजी यासंदर्भात निवेदन सादर केले होते.
मार्चचे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त्य माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी केली आहे.
वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी ( आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ) यांच्या कडून वितरीत झाल्यावर वेतनाचा मार्ग मोकळा होईल.