Close Visit Mhshetkari

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे गिफ्ट! पगारात होणार 8 हजाराची वाढ ?

7th pay commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सरकार आतापर्यंतचे सर्वात मोठे गिफ्ट देऊ शकते.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता,प्रवास भत्ता,पदोन्नती तसेच फिटमेंट फॅक्टरवरही विचार केला जाणार आहे.कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 8 हजार रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे.

HRA hike calculator

सन 2021 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता जेव्हा 25 % च्या पुढे गेला होता, तेव्हा सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती.सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 % होईल तेव्हा सरकार पुन्हा एकदा HRA मध्ये सुधारणा करणार आहे.

GPS pension updates

राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी लक्षात घेता , सरकारकडून आता जुनी पेन्शन योजना ऐवजी नविन गॅरंटेड पेन्शन प्रणाली अस्थित्वात आणणार असल्याची चर्चा आहे. यांमध्ये सेवा सेवकालावधी नुसार मुळ वेतनाच्या 35% , 40% , 50% रक्कम पेन्शन दिली जाऊ शकते.

हे पण वाचा ~  7th pay commission :मोठी बातमी ... केंद्र सरकारकडून आज होणार सरकारी कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा?

फिटमेंट फॅक्टर वाढणार ?

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरची भेट देऊ शकते.मीडिया रिपोर्टनुसार सरकार फिटमेंट फॅक्टरवर विचार करत असून त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनखी एक आनंदाची बातमी मिळताना दिसत आहे. सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आले होता.1 मार्च 2016 रोजी सर्वात कमी मुळ पगार 18000 रुपये करण्यात आला होता.

आता 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते.

Leave a Comment