Close Visit Mhshetkari

TDS vs Income Tax : TDS कापला ! आता टॅक्सही मोजावा लागणार? पगारदारांना दुहेरी फटका का? इन्कम टॅक्स गणित घ्या समजून ..

TDS vs Income Tax : नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष सुरू होताच नोकरदार वर्ग किंवा खाजगी खाजगी कंपनीत काम करणाऱ्या नोकरदार वर्गांना आपल्या इन्कम टॅक्स च्या संदर्भात हालचाली करताना पाहायला मिळतात.

आपल्या विभागात काम करत असलेले संबंधित अधिकारी आपल्याला आपल्या गुंतवणुकी संबंधात पुरावा मागत असतात.त्या आधारे करायची गणना करून आपण आपला टीडीएस कपात करत असतो.

Income Tax new rules

थोडक्यात दर महिन्याला पगारातून कपात केलेली रक्कम इन्कम टॅक्स बघायला पाठवले जाते,उरलेला पगार आपल्या खात्यात जमा केला जातो. टीडीएस आणि आयकर वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? तुम्हाला एकाच उत्पन्नावर दोनदा भरावे लागतील का, असा प्रश्न उपस्थित होतो.

टीडीएस म्हणजे काय?

TDS म्हणेज स्रोतावर कापला जाणार कर, जो तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतावर कापला जातो.आपला पगार क्रेडिट म्हणजे जमा होण्याअगोदर आपला नियुक्ता किंवा कंपनी तुमच्या करदायित्वाची गणना करून टीडीएस कपात करते.

प्राप्तिकर एका पगारदार व्यक्तीच्या एकूण उत्पन्नावर आकारला जाणारा कर आहे, जो तुम्ही पगाराव्यतिरिक्त कमावता. तुमच्या खात्यात पैसे आल्यावर आयकर गणनेची प्रक्रिया सुरू होते.

हे पण वाचा ~  Budget 2024 : अर्थसंकल्पात आयकर संरचनेत बदल नाही ! मग आयकर कसा आकारला जाणार?

एकाच उत्पन्नावर दोनदा कर?

आपला विभाग किंवा कंपनी पगारावर टीडीएस कपात कापून इन्कम टॅक्स विभागात जमा करत असेल , तर तुम्हाला मिळालेल्या पैशावर पुन्हा कर भरावा लागत नाही.तुमच्या कंपनीने आधीच खात्यातून पैसे कापून घेऊन आयकर विभागाकडे जमा केलेल्या असतात. 

ITR फक्त याची पुष्टी करण्यासाठी आणि तुमच्या कर दायित्वाचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी भरला जातो. साहजिकच यापुढे तुम्हाला तुमच्या पगारावर आयकर भरावा लागणार नाही.

दोनदा कर कधी भरावे लागणार?

मित्रांनो अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार आपण टीडीएस मूल्यांकन करून आपला पगार करमुक्त केला असेल परंतु सर्वांच्या काळात गुंतवणूक करून मिळालेले लाभांश बचत खात्यावरील व्याज वर इतर कोणत्याही स्वतःतून मिळणारे उत्पन्न असेल तर तुम्हाला टीडीएस मधील फरक देखील भरावा लागेल.

उदाहरणार्थ तुमचे एकूण उत्पन्न २० % टॅक्स स्लॅबमध्ये येते आणि TDS केवळ १०% दराने कापला असेल तर अशा परिस्थितीत, प्राप्तिकर विभाग मूळ कर कपात वगळता उर्वरित रकमेची मागणी करेल आणि नंतर तुम्हाला TDS कापूनही काही आयकर भरावा लागतो.

Leave a Comment