Small Savings Schemes: :भविष्य निर्वाह निधीआणि सुकन्या समृद्धी योजना – योजनांमध्येही गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्यात आले असल्याचे अर्थ मंत्रालया म्हटले आहे. हे दर पहिल्या तिमाहीच्या अनुषंगाने कायम राहतील. गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिस योजनांवर अधिक व्याज मिळू शकेल असे अपेक्षित होते
पारदर्शक करण्यासाठी केलेले बदल
तुम्ही हे न केल्यास, तुम्हाला या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या योजनांमधील गुंतवणूक अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने सरकारने हा बदल केला आहे.
या योजनांमधील गुंतवणूकदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीही हा बदल करण्यात आला आहे. अलीकडेच, वित्त मंत्रालयाने एक नोटीस जारी करून म्हटले आहे की, सरकारने जारी केलेल्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार आणि पॅन अनिवार्य असेल. यापूर्वी, आधार क्रमांक नसतानाही या योजनांमध्ये गुंतवणूक करता येत होती.
गुंतवणुकीसाठी आवश्यक बाबी
संबंधित नोटिशीत म्हणण्यात आले आहे की, गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आधार संख्या जमा करावी लागेल. तसेच, एका मर्यादेपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागेल. हा बदल सरकारकडून चालविल्या जाणाऱ्य योजांमधील गुंतवणूक अधिक पारदर्शी आणि सुगम बनविण्यासाठी करण्यात आला आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपल्याला खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक सादर करावा लागेल. तसेच, जर आपण ठराविक मर्यादेपेक्षा अधिक गुंतवणूक करत असाल, तर आपल्याला पॅन कार्डदेखील जमा करावे लागेल.
सहा महिन्यांच्या आत द्यावा लागेल आधार क्रमांक
पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी खाते उघडताना तुमच्याकडे आधार नसल्यास, तुम्हाला आधारसाठी नोंदणी स्लिपचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच, गुंतवणूकदाराला अल्प बचत योजनेच्या गुंतवणुकीशी जोडण्यासाठी, खाते उघडल्यापासून सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.
आवश्यक कागदपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- आधारकार्ड क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप
- पॅनकार्ड क्रमांक
- एनरोलमेंट स्लिप- PAN क्रमांक,
- सध्याच्या गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड जमा केले नाही, तर 1 ऑक्टोबर 2023 पासून त्यांचे अकाउंट बॅन केले जाईल.
महत्वाचे म्हणजे, जर विद्यमान गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅनकार्ड आणि आधारकार्ड सादर केले नाही तर त्यांचे खाते 1 ऑक्टोबर 2023 पासून बॅन केले जाईल. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी या सर्व गोष्टींची नोंद घेत वेळीच त्यांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड सादर करावे.