Public holidays : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फेक्षदि. 02 डिसेंबर 2022 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे याअन्वये सन 2023-24 या सार्वजनिक सुट्टयाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Public holidays of 2023
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचने नुसार दिनांक 8 मे 1968 नुसार महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासठी सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर केलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन शासकीय सेवा विभाग यांच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरुवारी स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच अधिकोष (बँक) यांना लागू राहणार नाही.
स्थानिक सुट्ट्या 2023
नागपूर जिल्ह्यात खालील तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
- शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ पोळ्यानंतरचा दुसरा दिवस,
- शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ महालक्ष्मी पूजन (जेष्ठगौरी पुजन)
- सोमवार १३ नोव्हेंबर २०२३ लक्ष्मीपुजनाचा दुसरा दिवस
महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार सन 2023 वर्षासाठी सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्याप्रमाणे यावर्षी एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या,8 वेळा शनिवार किंवा रविवार असणार आहेत.