DA Hike Calculator : आनंदाची बातमी ….. आता ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २% वाढ; पहा पगार वाढ आणि किती मिळेल फरक ?

DA Hike Calculator : महाराष्ट्र सरकारने खालील संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता सरकारकडून वाढवण्यात आला आहे.

आता अखिल भारतीय राज्य सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती मिळणार आणि त्याचा फरक कसा मिळणार याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

अखिल भारतीय राज्य सेवेतील राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

DA Hike Calculator of Employees

२. अखिल भारतीय राज्य सेवेतील कर्मचाऱ्याचा दिनांक  १ जुलै, २०२५ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५५% वरुन ५८% करण्यात आला आहे. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२५ पासून रोखीने देण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  DA Allowance : खुशखबर ..18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग सुकर! पहा किती आणि केव्हा मिळणार तुम्हाला फरक

३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहणार आहे.

४. सबंधित खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात येईल.

 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८११११२२०३७३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Leave a Comment