Salary account : शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन बैंक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत.
कर्मचारी पगार खाते अपडेट्स
पगार खात्या संदर्भात बँकाकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही.त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त अंतर्गत विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी/कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक ८/१०/२०२० अन्वये अवगत केलेले आहे.
बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदानाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र. २०३९/२०१७ व रिट याचिका क्र. १७५/२०१८ झाल्या होत्या.
सदर याचिकांमध्ये दि. ९.२.२०१८ रोजीच्या आदेशान्वये शाळा व शाळामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे वैयक्तिक खाते अन्य बैंकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
State Govemment Salary Package
वित विभागाच्या दिनांक ८/१०/२०२० च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त SGSP अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती दिलेली आहे.
सदर माहिती खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दि.९.२.२०१८ रोजीच्या आदेशानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोअर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे.
आता आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी यांचे मेन पुल अकाऊंट (पार्किंग अकाऊंट) वित्त विभागाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा अन्य बैंकेत उघडावे लागणार आहे.
🗞️ पगार खाते शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 👉 Salary Account
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२२०१११३१५९१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.
Everett Chapman