Public Holidays : सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत.या संदर्भात महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
थोर महापुरुष जयंती व राष्ट्रीय दिन
सदरील परिपत्रकानुसार दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी,साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात येणार आहे अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.
विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली आहे.
Public Holidays list 2024
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा समावेश जयंती कार्यक्रमामध्ये करण्याबाबत वेगळयाने शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.
जयंती/राष्ट्रीय दिन इंग्रजी महिना व दिवस वार
- सावित्रीबाई फुले जयंती ३ जानेवारी, २०२४ बुधवार
- जिजाऊ माँसाहेब जयंती १२ जानेवारी, २०२४ शुक्रवार
- स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी, २०२४ शुक्रवार
- ने.सुभाषचंद्र बोस जयंती २३ जानेवारी,२०२४ मंगळवार
- बाळासाहेब ठाकरे जयंती २३ जानेवारी,२०२४ मंगळवार
- सेवालाल महाराज जयंती १५ फेब्रुवारी,२०२४ गुरुवार
- छ.शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी,२०२४ सोमवार
- बाळशास्त्री जांभेकर जयंती २० फेब्रुवारी,२०२४मंगळवार
- संत गाडगे बाबा जयंती २३ फेब्रुवारी, २०२४ शुक्रवार
- संत रविदास महाराज जयंती (माघ पौर्णिमा या तिथीनुसार) २४ फेब्रुवारी, २०२४ शनिवार
- यशवंतराव चव्हाण जयंती १२ मार्च, २०२४मंगळवार
- शहीद दिन २३ मार्च, २०२४ शनिवार
- महात्मा ज्योतिबा फुले जयंती ११ एप्रिल, २०२४ गुरुवार
- डॉ.आंबेडकर जयंती १४ एप्रिल,२०२४ रविवार
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती ३० एप्रिल,२०२४ मंगळवार
- महात्मा बसवेश्वर जयंती (वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) तिथीनुसार) १० मे, २०२४ शुक्रवार
- छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ मे, २०२४ मंगळवार
- दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस २१ मे, २०२४ मंगळवार
- स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती २८ मे, २०२४ मंगळवार
- अहिल्यादेवी होळकर जयंती ३१ मे, २०२४ शुक्रवार
- महाराणा प्रतापसिंह जयंती (ज्येष्ठ शुक्ल तृतीया या तिथीनुसार) ९ जून, २०२४ रविवार
- राजर्षि शाहू महाराज जयंती २६ जून, २०२४ बुधवार
- वसंतराव नाईक जयंती १ जुलै, २०२४ सोमवार
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती २३ जुलै, २०२४ मंगळवार
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती १ ऑगस्ट,२०२४ गुरुवार
- क्रातिसिंह नाना पाटील जयंती, ३ ऑगस्ट, २०२४ शनिवार
- सद्भावना दिवस २० ऑगस्ट, २०२४ मंगळवार
- राजे उमाजी नाईक जयंती ७ सप्टेंबर, २०२४ शनिवार
- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती
- १७ सप्टेंबर, २०२४ मंगळवार
- पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस २५ सप्टेंबर, २०२४ बुधवार
- महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्री जयंती २ ऑक्टोबर, २०२४ बुधवार
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती १५ ऑक्टोबर, २०२४ मंगळवार
- महर्षि वाल्मिकी जयंती (आश्विन पौर्णिमा या तिथीनुसार)
- १७ ऑक्टोबर, २०२४ गुरुवार
- इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस ३१ ऑक्टोबर, २०२४ गुरुवार
- वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस ३१ ऑक्टोबर,२०२४ गुरुवार
- पंडीत नेहरु जयंती १४ नोव्हेंबर, २०२४ गुरुवार
- बिरसा मुंडा जयंती १५ नोव्हेंबर, २०२४ शुक्रवार
- इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन १९ नोव्हेंबर, २०२४ मंगळवार
- संविधान दिवस २६ नोव्हेंबर, २०२४ मंगळवार
- संत संताजी जगनाडे महाराज जयंती ८ डिसेंबर, २०२४ रविवार
- अटल बिहारी वाजपेयी जयंती २५ डिसेंबर, २०२४ बुधवार
- वीर बाल दिवस २६ डिसेंबर, २०२४ गुरुवार
- डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख २७ डिसेंबर, २०२४ शुक्रवार
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३१२२७१६०९१२४२०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकि करुन काढण्यात आला आहे.