Close Visit Mhshetkari

EPFO Calculator : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी …. वाढीव पेन्शनचा पर्याय निवडण्याची मुदत पुन्हा वाढली! 

EPFO Calculator : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने EFPO उच्च निवृत्तीवेतनाचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांचा तपशील सादर करण्यासाठी अंतिम तारीख ३ महिन्यांसाठी वाढवली आहे. 

श्रम व कामगार मंत्रालय यांच्या एका निवेदनात म्हटले गेले आहे की, नियोक्ते आणि नियोक्ता संघटनांनी मंत्रालयाला अर्जदार निवृत्तीवेतनधारक/सदस्यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी मुदत वाढविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

वाढीव पेन्शनसाठी मिळाली पुन्हा मुदतवाढ

कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नियोक्ते आणि नियोक्ता संघटनांनी मंत्रालयाला अर्जदार निवृत्तीवेतनधारक/सदस्यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी मुदत वाढविण्याचे आवाहन केले होते.

सध्या पगार आणि भत्त्यांच्या पडताळणीसाठी साधारणपणे २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत नियोक्त्यांकडे ५.५२ लाख अर्ज प्रलंबित आहे. कामगार मंत्रालय नुसार सदरील विनंतीवर विचार केल्यानंतर EPFO बोर्डाच्या अध्यक्षांनी नियोक्त्यांना पगाराचा तपशील इत्यादी सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे.

हे पण वाचा ~  EPFO Rules : पगारातून कपात झालेले पैसे आपल्या पीएफ खात्यात जमा न झाल्यास 15 दिवसात करता येते तक्रार! पहा सविस्तर

पेन्शन वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी काय करावे?

वाढीव पेन्शनसाठी पर्याय अर्ज कंपनीकडे भरून द्यावे लागणार आहे.कर्मचाऱ्याने अर्ज भरून न दिल्यास त्याला सध्या जे लागू आहे त्यानुसारच म्हणजे अत्यल्प इतकी पेन्शन मिळेल.

Eps योजना पर्याय स्वरूपातील असल्याने मागणी केल्यावरच ती लागू होते.कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज टपालाने कंपनीच्या मुख्यालयाकडे पाठवायचे आहेत.एक प्रत ईपीएफ कार्यालायला देखील माहितीसाठी टपालाने पाठवायची आहे.

आपली वाढीव पेन्शन रक्कम येथे कॅल्क्युलेट करा

EPFO calculator

Leave a Comment