Close Visit Mhshetkari

EPFO calculator : पीएफने केली व्याजदरात वाढ ! खातेधारक घरबसल्या असा चेक करू शकतात आपले अकाऊंट बॅलन्स

EPFO calculator : ईपीएफओने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २८ मार्च २०२३ रोजी ८.१५ व्याजदराचा प्रस्ताव पाठविला होता. तो सरकारने मंजूर केला आहे.”एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायजेशन” अर्थात ‘EPFO’चे सदस्य असलेल्या नोकरदार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. PF खात्यात जमा रक्कमेवर शासनाने ८.१५ % व्याज देण्यास मंजुरी दिली.

भविष्य निर्वाह निधी संघटना अपडेट्स

प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायजेशन ने २०२२-२३ आर्थिक वर्षाकरिता २८ मार्च २०२३ रोजी ८.१५ % व्याजदराचा प्रस्ताव पाठवलेला होता. केंद्र सरकारने सदरील प्रस्ताव मंजूर केला असून सर्व विभागीय कार्यालयांना ८.१५% या दराने सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे.

आपल्याला माहिती असेल की,गेल्या आर्थिक वर्षात व्याजदर ८.१०% होता,जो १९७७-७८ या वर्षानंतरचा हा सर्वांत कमी व्याजदर होता. आपल्या पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली हेसुद्धा आपल्याला घरबसल्या पाहता येणार आहे.

पीएफ रक्कमेवर किती व्याज मिळणार?

जुन्या आणि नव्या दराने मिळणारे व्याज उदाहरणासह समजून घेऊया.

  • व्याज दर- ८.१०% ८.१५%
  • ₹१ लाख ₹८,१०० ₹८,१५०
  • ₹३ लाख ₹२४,३०० ₹२४,४५०
  • ₹५ लाख ₹४०,५०० ₹४०,७५०
हे पण वाचा ~  PF Withdrawal Facility : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! तीन वर्षांनंतर बंद होणार ही सुविधा?

ऑनलाइन कसा चेक कराल बॅलन्स?

आपल्याला जर आपल्या epfo खात्यातील रक्कम चेक करायचे असेल तर उपयोगच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या जमा रक्कम केव्हाही चेक करू शकता. मात्र,यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणे आवश्यक आहे.

यासाठी सर्वप्रथम EPFO ​​च्या ‘MEMBER e-SEWA’ वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला वेबसाइटच्या तळाशी ‘तुमचा UAN नंबर जाणून घ्या’ हा पर्याय दिसेल.

जर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक माहित असेल, तर तुम्ही थेट त्याच्या वर दिलेल्या ‘Activate UAN’ या पर्यायावर क्लिक करावे.या ठिकाणी ऑनलाइन शिल्लक तपासण्यासाठी EPF पासबुक पोर्टलला भेट द्या आणि UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.

यानंतर पासबुक Download/View Passbook वर क्लिक करा. असे केल्यावर तुमच्या समोर पासबुक ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम पाहता येईल.

👉आपली पीएफ खात्यातील रक्कम येथे चेक करा👈

Leave a Comment