Savings Account : आपली बचत कुठेतरी गुंतवण्याऐवजी आपल्या बँक खात्यात ठेवत असतात. बँकेकडून ,बचत खात्यावर फारच कमी व्याज दिले जात. बहुतांश बँकांमध्ये हा दर 2.50 ते 4 टक्क्यांपर्यंत आहे. जर तुम्हाला बचत खात्यावर अधिक व्याज मिळवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही बचत खात्यात जमा,केलेल्या रकमेवर एफडीइतके व्याज मिळवू शकता.
तुमच्या बँक खात्यात अधिक व्याजासाठी तुम्ही ऑटो स्वीप सुविधा सुरू करू शकता. जे लोक त्यांच्या बचत खात्यात जास्त पैसे ठेवतात त्यांच्यासाठी ऑटो स्वीप सुविधा खूप फायदेशीर ठरू शकते.
Bank deposit update 2023
- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयकडून 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 5.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.75 टक्के लाभ मिळत आहे.
- आयसीआयसीआय बँक 185 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 5.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के परतावा देत आहेत.
- एचडीएफसी बँक सामान्य गुंतवणूकदारांना 5.75 टक्के आणि 60 वर्षांवरील नागरिकांना 6 महिने ते 9 महिन्यांच्या एफडीवर 6.25 टक्के परतावा देत .
पैसे काढण्यासाठी FD तोडण्याची गरज नाही
ऑटो स्वीप सुविधा सुरू केल्यानंतर तुमच्या FD खात्यात ट्रान्सफर होणारे पैसे काढणे देखील सोपे ,आहे. यासाठी तुम्हाला एफडी ,तोडण्याची गरज नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही थेट तुमच्या बचत खात्यातून पैसे काढू शकता. तुमच्या बचत खात्यातील ,शिल्लक मर्यादेपेक्षा कमी होताच, पैसे FD खात्यातून परत येतात आणि बचत खात्यात जोडले जातात. अशा प्रकारे तुम्ही एफडीच्या दराने बचत खात्यावर व्याज मिळवू शकता.