Cash Deposit Rules : नमस्कार मित्रांनो, बँकेत खाते असणे हे आता सर्व सामान्य बाब झाली आहे आपल्या सेविंग खात्यात पैसे जमा करणे चांगली सवय मानली जाते. मित्रांनो अभिनयाच्या काळात कळत नकळत जमा केलेल्या बचतीचा फायदा आपल्याला वेळोवेळी निगडीच्या वेळेस होत असतो.
भारतामध्ये बँकेच्या नियमांअंतर्गत Saving Account सुरु करण्यासाठी कोणत्याही प्राथमिक रकमेची गरज शक्यतोवर नसते.
Bank Savings Account Cash Deposit Rules
थोडक्यात, बचत खाते सुरू करण्यासाठी एका रुपयाची आवश्यकता नसते. परंतु या बचत खात्यात आपण नक्की किती पैसे बचत करू शकतो;याविषयी आरबीआयने नियमावली ठरवून दिलेली. बँक ग्राहकांना गुंतवणुकीची नेमकी मर्यादा काय आहे? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Saving Account मध्ये बचत खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम जमा करणे अपेक्षित आहे; याची मर्यादा नाही. पण मित्रांनो आपण जर वर्षभरात आपल्या बचत खात्यावर दहा लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करत असू तर अशावेळी त्याची माहिती बँक सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज (CBDT) ला देते असते. आता हा नियम एफडी,कॅश डिपॉझिट,म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअरमधील गुंतवणुकीवर सुद्धा लागू असतो.
अर्थतज्ज्ञांच्या माहितीनुसार भारतातील व्यक्ती कोणत्याही बँकेत कितीही रक्कम जमा करू शकते फक्त या खात्यावर जमा होणाऱ्या व्याजावर आपल्याला आयकर भरणे आवश्यक असते.
TDS on Saving account Interest
मित्रांनो आपल्याला सांगायचं झाल्यास बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवर मिळणारा जो व्याजाचा पैसा असतो, त्यावर बँकेकडून 10 % TDS कापला जातो. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80 टीटीए नुसार 10 हजार किंवा त्याहून कमी व्याज असल्यास कर सवलत मिळते. तर, 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त करण्यात आले आहे.
आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होणारा रकमा जर जास्त असेल तर आयकर विभागाकडून रिसर्च चौकशी होते येथे खातेदाराकडून समाधानकारक उत्तरं मिळाल्यास पुढील कारवाई केली जाते, त्यामुळे सेविंग अकाउंट मध्ये रक्कम टाकताना विचारपूर्वक व्यवहार करावा.