Close Visit Mhshetkari

7th Pay Arrears : आता या कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते होणार अदा! परिपत्रक निर्गमित …

7th pay arrears : आता माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ४ था हप्ता (राहिलेला १,२ व ३ रा) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

सातवा वेतन आयोग थकित हप्ता!

संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक शिक्षकेतर/टि-५/६/२३-२४/६२६७ दि. २०/१२/२०२३ आणि संचालनालयाचे पत्र क्र.शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/थ. दे/ऑनलाईन /५५७/ दि.३०/०१/२०२४ नुसार दि. १३/०२/२०२४ रोजी व्हीसीमध्ये दिलेले निर्देश दिलेले आहे.

दि. १३/०२/२०२४ रोजीच्या व्हीसी मध्ये दिलेल्या निर्देशानुसार लेखाशीर्ष क्र. २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२०५१९, २२०२०४६९, २२०२०५०२, २२०२१९०१, २२०२१९४८, २२०२एच९७३ मध्ये मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, ३ हप्ता राहिला असल्यास) चौथा हप्ता माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा ~  7th pay commission :मोठी बातमी ... केंद्र सरकारकडून आज होणार सरकारी कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा?

7th pay installment Arrears 

भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दूसरा, तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

सदरील उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार शिक्षनधिकारी यांच्याकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल, या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे.मा.शिक्षण संचालक यांचे मान्यतेने सदरील परिपत्रकानुसार निर्गमित करण्यात आले आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment