Close Visit Mhshetkari

UPI loan offer : बँक खात्यात पैसे नाहीत, तरीही UPI द्वारे पेमेंट करता येणार, कसा घ्याल या सुविधेचा लाभ?

UPI loan offer : देशात UPI प्रणालीद्वारे होणारे व्यवहार वेगाने वाढत आहेत.आतापर्यंत युपीआयद्वारे व्यापाऱ्याला पेमेंट करण्यासाठी तुमच्या बँक खात्यात पैसे असणे आवश्यक असते.पण आता खात्यात पैसे नसताना लवकरच तुम्ही पेमेंट करू शकणार आहे.

UPI pre approved loan

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमधील व्यवहारांसाठी बँकांद्वारे जारी केलेल्या प्री अप्रुव्ह्ड क्रेडिट लाइनला मंजुरी दिली आहे.रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता युपीआयमध्ये व्यवहारांसाठी बँकांद्वारे दिली जाणारी “प्री अप्रुव्ह्ड लोन प्रणाली” जोडली जाऊन बँकांना ग्राहकाच्या खात्यात पैसे नसतानासुद्धा पेमेंट करता येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले की, सध्या बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाणार आहे.आता यूपीआयद्वारे क्रेडिट लाइन्सला फंडिंग अकाउंटच्या रुपात सामील करुन याची व्याती वाढ केली जाणार आहे. RBI ने म्हटले की, या सुविधेअंतर्गत UPI प्रणाली वापरुन प्री-अप्रुव्हड कर्ज मिळेल.

युपीआय प्री अप्रुव्ह्ड प्रणाली कर्ज सुविधा

दि.6 एप्रिल रोजी केंद्रीय बँकेने आपल्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत बँकांकडून पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन हस्तांतरित करुन पेमेंट करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.UPI प्री-अप्रुव्हड कर्ज प्रणालीसाठी बँकेला बोर्डाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

हे पण वाचा ~  UPI payment : ऑनलाइन किंवा ऑफलाइन, क्रेडिट-डेबिट कार्ड डिटेल्स शेअर करण्यापूर्वी अशी घ्या काळजी, अन्यथा..

सदरील प्रक्रिया राबवण्यापूर्वी सर्व बँकांना धोरण तयार करून त्यांच्या संचालक मंडळाकडून मंजुरी घेणार आहे.UPI Loan पॉलिसी अंतर्गत किती कर्ज दिले जाऊ शकते? ते कोणाला देता येईल? कर्जाचा कालावधी काय असेल? तसेच कर्जावर किती व्याज आकारले जाईल? हे यानंतर स्पष्ट होणार आहे.

क्रेडिट लाइन कर्ज योजना

युपीआय प्री अप्रुव्ह्ड प्रणाली द्वारे बँका आपलाला निश्चित कर्जाची रक्कम अधीच मंजूर करावी लागणार आहे. ग्राहक हे पैसे युपीआय पेमेंटसाठी आणि आवश्यकतेनुसार वापरून खर्च केलेल्या रकमेवर बँक तुमच्याकडून व्याज आकारेल.युपीआय क्रेडिट लाइन क्रेडिट हिस्ट्री आणि प्रोफाइल बघून कर्जाची मर्यादा ठरवणार आहे. प्रत्येक ग्राहकांसाठी वेगळवेगळी असणार आहे.

क्रेडिट लाइन कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँकेकडे अर्ज करावा लागतो. बँक युपीआय प्री अप्रुव्ह्डसुविधा तुमच्या खात्याशी लिंक करेल. रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, बहुतेक सरकारी आणि खाजगी बँका लवकरच ही सुविधा सुरू करता येईल.

4 thoughts on “UPI loan offer : बँक खात्यात पैसे नाहीत, तरीही UPI द्वारे पेमेंट करता येणार, कसा घ्याल या सुविधेचा लाभ?”

Leave a Comment