Close Visit Mhshetkari

Employees Allowance : कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक.. सरकार लवकरच घेणार राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा ‘हा’ निर्णय, पहा..

Employees Allowance : महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.अशातच केंद्र सरकार द्वारे मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी सरकारकडून लवकरच वाढीव महागाई भत्ता गिफ्ट दिले जाऊ शकते.

42% महागाई भत्ता वाढ अपडेट्स

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या देखील कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली असूनया मागणीवर शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये वित्त विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसाठीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना 4% टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

7th pay commission updates

मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर महागाई भत्ता वाढीचा लाभ पुढील महिन्यापासून राज्यातील सर्वच शासकीय,अनुदानित शाळांमधील कर्मचारी,जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळणार आहे.

Government employees news

आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे.त्याचवेळी फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हे फिटमेंट फॅक्टर २०२६ पासून लागू होऊ शकते आणि २०२४ मध्ये निवडणुका होणार असल्याने २०२३ च्या अखेरीस त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.याचा फायदा ५२ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

हे पण वाचा ~  7th Pay DA hike : खुशखबर ... ' या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 4% ने वाढवला !

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणतीही वाढ होणार नाही,परंतु 2024 मध्ये पुनरावलोकनानंतर ती वाढविली जाऊ शकते. मात्र सरकारकडून याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.विभाग त्यावर विचार करेल आणि अर्थ मंत्रालयाकडे शिफारसही पाठवता येईल. दुसरीकडे नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू आहे.

आठवा वेतन आयोग

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता.आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे.

वास्तविक,पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी केली जात आहे.8 व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment