Sweep-in FD : आज जवळपास प्रत्येक व्यक्तीचे एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत.जवळपास ही बँक खाते बचत खाते स्वरूपात (Savings Bank Account) आहेत.
लोक त्यांचे पैसे या बचत खात्यात सुरक्षित ठेवतात.बचत खात्याच्या रक्कमेवर बँकेकडून २-३ % व्याज पण मिळते.हे व्याज अतिशय कमी असून आपल्याला Bank FD वर ६-७ % व्याज मिळते आपल्याला माहीत आहे.
काय आहे Sweep-in FD ?
आपल्या माहिती आहे की एफडीमध्ये पैसे कसे टाकाले की, गरज असताना अचानक पैसे कसे काढायचे? तुम्हालाही असे वाटत असल्यास, तुम्ही Sweep-in FD ची निवड करू शकता.या अंतर्गत, तुम्हाला बचत खात्यातच एफडीचे व्याजदर मिळू शकतो.
स्वीप-इन-एफडी ही बॅंकेची ऑटो-स्वीप सेवा आहे. याद्वारे तुमच्या बचत खात्यात जे काही अतिरिक्त पैसे असतात ते FD मध्ये ट्रान्सफर केले जातात.बचत खात्याशी जोडलेली बॅंक एफडी १-५ वर्षांसाठी असते.
आता आपल्या खात्यातील जमा पैसे खात्यात कधी ग्राह्य धरले जाणार आणि पैसे कधी हस्तांतरित होणार ? असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी तुम्हाला थ्रेशोल्ड लिमिट निश्चित करावी लागते.
थ्रेशोल्ड लिमिट काय असते?
बँके स्वत: स्वीप थ्रेशोल्ड मर्यादा ठरवते परंतु खातेदाराला गरजेनुसार कस्टमाईज करण्याचा पर्याय देखील दिला जातो. सदरील मर्यादा अधिक पैसे असल्यास ते आपहूनच एफडी अकाऊंटमध्ये वळती होतात.थोडक्यात तुम्हाला बचत खात्यावरच एफडीचे व्याज मिळते.
जोपर्यंत आपल्या खात्यात थ्रेशोल्ड लिमिटपेक्षा रक्कम जास्त होत नाही, तोवर पैसे ट्रान्सफर केले जात नाहीत.म्हणजे तुमची थ्रेशोल्ड मर्यादा २५००० रुपये असेल असेल आणि किमान एफडी अमाऊंट ५००० रुपये असेल, तर तुमच्या बँक खात्यात ३०००० रुपये असतील तरच ५००० रुपये एफडीमध्ये ट्रान्सफर केले जातात.
बॅंक एफडी मॅच्युरिटी कालावधी
आपल्या Sweep-in FD चा मॅच्युरिटी कालावधी देखील बँकेद्वारे निश्चित केला जातो. त्यापूर्वी तुम्ही एफडीचे पैसे काढू शकणार नाही. समजा तुमच्या खात्यातून ५ हजार रुपये एफडीमध्ये गेले आणि तुमचा किमान मॅच्युरिटी कालावधी १५ दिवस असेल, तर तुम्ही ते पैसे १५ दिवसांपूर्वी काढू शकणार नाही. आपण जर मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला १ % पर्यंत दंड लागू शकतो.