State Employees : मोठी बातमी… “या” राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत नवीन निर्णय निर्गमित…

State Employees : राज्यातील नगरपरिषदेमधील दैनंदिन काम व विकास कामांचे सुसूत्रीकरण व्हावे, त्यांच्या सेवा शर्ती, वेतनश्रेणी यांच्यात समानता असावी व विहित शैक्षणिक अर्हता पात्र जबाबदार अधिकारी नगरपरिषद प्रशासनास उपलब्ध व्हावेत म्हणून शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्ग (State Employees) स्थापन केलेले आहेत.

राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्यांसंबंधीचे धोरण संदर्भ क्र.४ येथील दि.११.०५.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले आहे.

State Employees update

नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी /कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्यासंबंधी पुढीलप्रमाणे धोरण विहीत करण्यात येत आहे:-

(१) राज्यस्तरीय संवर्गातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना घोषित करण्यात येत आहे.

(२) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी सदर धोरणानुसार सन २०१७च्या सर्वसाधारण नियतकालीक बदल्यांपासून कार्यवाही करावी.

(३) राज्यस्तरीय संवर्गातील पदांवरील अधिकारी असल्याने, ते संपूर्ण राज्यात बदलीस पात्र असतील. कर्मचारी हे राज्यस्तरीय संवर्गात कार्यरत

(४) राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्याची एका नगरपरिषदेत ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांस / कर्मचाऱ्यास कोणऱ्याही परिस्थितीत एका नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये ४ वर्षापेक्षा जास्त कालावधीकरीता ठेवता येणार नाही.

(५) राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यास एकाच जिल्ह्यात २ पदावधी पेक्षा (६ वर्षापेक्षा) जास्त कालावधीसाठी ठेवता येणार नाही.

(६) राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची पदोन्नतीने नेमणूक करताना सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम, २०१५ चा अवलंब करण्यात यावा.

हे पण वाचा ~  State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी! मुख्यालयी राहण्यापासून लवकरच सुटका ...

(७) आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी बदली अधिनियम, २००५ मधील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

नगर परिषद कर्मचारी बदली शुध्दीपत्रक

शासन निर्णयामधील नियम / धोरण क्र. (६) वगळून त्याऐवजी नियम / धोरण क्र. (६) मध्ये खालीलप्रमाणे नियम समाविष्ट करण्यात आले आहे.

(अ) राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी यांची सरळसेवेने नेमणूक करताना सामान्य प्रशासन विभागाच्या “महसूल विभाग वाटप नियमावली, २०२१चा अवलंब करण्यात यावा.

(आ) राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी यांची श्रेणी ब मधून श्रेणी अ मध्ये पदोन्नतीने नेमणूक करताना सामान्य प्रशासन विभागाच्या “महसूल विभाग वाटप नियमावली, २०२१” चा अवलंब करण्यात यावा.

(इ) राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी यांची श्रेणी-क मधून श्रेणी-ब मध्ये पदोन्नती करताना या कर्मचा-यांना सामान्य प्रशासन विभागाच्या “महसूल विभाग वाटप नियमावली, २०२१मधून वगळण्यात येत आहे.”

सदरील सुधारणा वगळता संदर्भाधीन दि. ११.०५.२०१७ येथील शासन निर्णयातील उर्वरीत अटी-शर्ती व धोरण कायम राहील.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०९२२१६१२०८८३२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Leave a Comment