Close Visit Mhshetkari

Lenovo laptop : बापरे … तब्बल 4 लाख 49 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप! जाणून घ्या या कारहूनही महागड्या लॅपटॉपचे फिचर्स ..

Lenovo Laptop : नमस्कार मित्रांनो तुम्ही आतापर्यंत एक ते दीड लाखापर्यंतच्या लॅपटॉप बद्दल ऐकलं असेल किंवा तो पहिला असेल सुद्धा परंतु आज आपण एका अशा लॅपटॉपची माहिती बघणार आहोत ज्याची किंमत तब्बल एका फोर व्हीलर एवढी आहे चला तर बघूया त्या लॅपटॉप विषयी सविस्तर माहिती

Lenovo Legion 9i Laptop

मित्रांनो जगभरात कम्प्युटर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या लेनोवो कंपनीने हा नवीन लॅपटॉप बाजारात आणला आहे आहे गेमिंग लॅपटॉप असून लेनोवो लिगॉन 9i असे या लॅपटॉपचे नाव आहे. लॅपटॉपची किंमत तब्बल 4.5 लाख रुपये इतकी आहे.

Legion 9i Lenovo विषयी अधिक माहिती पाहिजे झाल्यास, फिचर्स काय? त्याची किंमत ऐवढी अधिक ठेवण्यास आली आहे? असे प्रश्न पडले सहाजिक आहे. पण मित्रांनो लॅपटॉपचे कॉन्फिगरेशन आणि स्पेसिफिकेशन्स पाहिल्यावर गेमिंगची उत्तम जाण असलेल्यांसाठी हा लॅपटॉप असल्याचे लगेच लक्षात येते.लॅपटॉपबद्दल जाणून घेऊयात

Lenovo Legion 9i features

Lenovo Legion 9i हा एक उच्च-कार्यक्षमता असलेला गेमिंग लॅपटॉप आहे. त्याची किंमत जवळपास टाटा पंच या कारच्या किंमतीएवढी आहे. या लॅपटॉपची किंमत इतकी जास्त असण्याची अनेक कारणे आहेत.

स्क्रीन : Lenovo Legion 9i मध्ये 16 इंचाची मिनी एलईडी डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचं रेझोल्यूशन 3.2 के इतकं आहे आणि रिफ्रेश रेट 165 एचझेड इतका आहे. यामुळे डिस्प्लेची क्वालिटी उत्तम आहे.

प्रदर्शन : Lenovo Legion 9i मध्ये 13 व्या जनरेशनचं इंटेल आय 9 प्रोसेसर आणि आरटीएक्स 4090 ग्राफिक्स कार्ड देण्यात आलं आहे. यामुळे हा लॅपटॉप सर्वात ग्राफिक्स-निष्ठी गेम्स देखील सहजपणे चालवू शकतो.

कूलिंग सिस्टम : Lenovo Legion 9i मध्ये लीजन कोल्डफ्रण्टचं लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आलं आहे. यामुळे लॅपटॉप गेमिंगदरम्यान ओव्हरहीट होत नाही.

Top Lenovo Laptop 2024

लेनोवो लॅपटॉपची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • 16 इंचाची मिनी एलईडी डिस्प्ले
  • 3.2 के रेझोल्यूशन
  • 165 एचझेड रिफ्रेश रेट
  • 3 मायक्रो सेकंद रिस्पॉन्स टाइम
  • 1200 निट्स पीक ब्राइटनेस
  • डॉल्बी व्हिजन
  • आरजीबी बॅकलिट किबोर्ड
  • स्वॅप करण्यायोग्य सिरॅमिक कॅप्स
  • 2 वॉटचे नाहिमिक स्पीकर
  • 1080 पी वेब कॅम
  • 13 व्या जनरेशनचं इंटेल आय 9 प्रोसेसर
  • आरटीएक्स 4090 किंवा आरटीएक्स 4080 ग्राफिक्स कार्ड
  • 32 जीबी किंवा 64 जीबी ड्युएल चॅनेल डीडीआर फाव्ह रॅम
  • 2 जीबीपर्यंत स्टोरेज
  • लीजन कोल्डफ्रण्टचं लिक्विड कूलिंग सिस्टम
  • 99.99 डब्यूएच आर की
  • 30 मिनिटांत 70 टक्के बॅटरी चार्ज
  • 330 डब्लू स्लिम अ‍ॅडप्टर किंवा 140 डब्लूचा युएसबी-सी पॉवर डिलेव्हरी अ‍ॅडप्टरचा पर्याय

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment