Close Visit Mhshetkari

Share Market : सरकारी कर्मचारी शेअर्स खरेदी – विक्री करू शकतो का? पहा काय नियम काय सांगतो …

Share Market : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आजकाल नोकरदारासह सर्वच व्यक्ती बचत बचतीचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात.सध्या शेअर मार्केटमध्ये बऱ्याच लोकांचा कल वाढलेला असून,आकर्षक योजनेत पैसे गुंतवल्याने आयुष्यात फायदा मिळत असल्याची भावना लोकांची झालेली आहे.

सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे का हा प्रश्न नेहमी पडत असतो.तर आज आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सरकारी कर्मचाऱ्यांना काही नियमांचे पालन करावे लागते.घरात एखादा सरकारी कर्मचारी असेल तरी इतरांना काही गोष्टींचे पालन करावे लागते.

कर्मचारी शेअर मार्केट गुंतवणुक नियम

Intra day and future options : केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम, १९६४ कलम ३५ अ नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला शेअर्स किंवा इतर प्रकारच्या सट्टा बाजारात पैसे लावता येत नसतात.आर्धिक फायद्यासाठी सतत शेअर्स घेणे आणि विकणे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी नाही. 

दीर्घ मुदत गुंतवणुक : सरकारी अधिकारी यांनी स्टॉक ब्रोकरच्या माध्यमातून दीर्घ मुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर चालू शकते.

हे पण वाचा ~  Mutual Funds : 2024 मध्ये सर्वाधिक परतावा देणारे टॉप स्मॉलकॅप म्युच्युअल फंड्स; एका वर्षात तब्बल ४०%पेक्षा जास्त परतावा ??

हितसंबंध : सरकारी नोकरीत असताना ज्या कंपनीच्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक करत आहात त्यामध्ये आपला हितसंबंध आज येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

राखीव कोट्यातील शेअर्सची : काही कंपन्यांचे शहर हे संचालकांसाठी राखीव असतात.सरकारी कर्मचाऱ्याला अशा राखीव कोट्यातून शेअर्स खरेदी करता येत नाही. 

IPO buying : सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना एखाद्या कंपनीने ऑफर मध्ये किंवा अन्य प्रकारच्या शेअरविक्री प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.सदरील नियम सरकारी कर्मचाऱ्याच्या परिवारातील अन्य सदस्यांनाही लागू करण्यात आला आहे. 

गुंतवणुकीची माहिती देणे बंधनकारक :- मित्रांनो सरकारने कर्मचाऱ्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत 2019 मध्ये नवीन नियम लागू केलेले आहेत. सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी यांना आता आपली माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अ आणि ब गटातील कर्मचाऱ्यांना 50000 पेक्षा अधिक गुंतवणूक केल्यास तसेच क वर्गातील कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम गुंतवल्यास या संबंधातील माहिती देणे किंवा जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment