Close Visit Mhshetkari

Provident Fund : तुम्ही PF मधून कोणत्या उद्देशाने पैसे काढू शकता? लग्नासाठी पैसे कधी व किती वेळा काढू शकता; पहा नियम.

Provident Fund : मित्रांनो आपल्या पीएफ अकाउंट मधून आपल्याला पैसे काढण्याची आवश्यकता वेळोवेळी भाषेत असते आपल्याला माहिती असेल की, आपल्या पगारातून कपात होणाऱ्या पीएफ खात्याचा आपल्या निवृत्तीच्या समयी मोठा उपयोग होत असतो.

आर्थिक संकटात सापडल्यावर सुद्धा पीएफ खात्यातील रक्कम आपल्याला आधार देत असते. पीएफ मधील पैसे केव्हा केव्हा काढता येतात.या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

PF मधून पैसे केव्हा शकता?

मित्रांनो वैद्यकीय कारणासाठी शिक्षण,लग्न , जमीन खरेदी, बेरोजगार असल्यास तुम्ही आपल्या खात्यातील पैसे काढू शकता. लग्नासाठी पैसे काढण्यासाठी ईपीएफ सदस्य झालेल्या उद्योग धारकाच सात वर्ष खातेदार असले आवश्यक आहे.

आपण आपल्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नासाठी EPF मधून रक्कम काढू शकता.

हे पण वाचा ~  PF Calculation : वय 25 वर्ष आणि पगार सॅलरी 25 हजार रुपये; तर कर्मचाऱ्याला रिटायरमेंट फंड किती मिळणार? पहा कॅलक्युलेशन ...

किती पैसे काढता येतील?

आपल्या पीएफ खात्यामध्ये दोन प्रकारचे पैसे असतात, एक म्हणजे तुमच्या पगारातून कापलेले पैसे आणि कंपनीद्वारे जी रक्कम जमा केली जाते, ज्याला कंपनीचे योगदान म्हणतात. तुम्ही तुमच्या ईपीएफ मधील ५० % योगदान लग्नासाठी काढू शकतो. आपण लग्न आणि शिक्षणासाठी तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढू शकत नाही.

आपण एकदा काढलेले पैसे पुन्हा पीएफमध्ये जमा करू शकत नाही.विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही EPF अ‍ॅडव्हान्स काढून घ्याल, तेव्हा आवश्यक तेवढेच घ्या, कारण तुम्ही EPF मधून काढलेले पैसे पुन्हा जमा करू शकणार नाही.

ईपीएफओच्या नियमांनुसार पीएफचे पैसे आगाऊ म्हणजे वेळेपूर्वी काढू शकता. EPF मधील रक्कम काढण्याकारीता फॉर्म ३१ सबमिट करावा लागेल. तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यास पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment