Close Visit Mhshetkari

Post Office scheme : पोस्टाची जबरदस्त योजना, एकदा पैसे जमा करा; दर महिन्याला कमाई, पाहा ₹ 5 लाखांचे गणित

Post Office scheme : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, सध्या स्थितीत गुंतवणुकीचे अनेक मार्ग शोधत असतात. त्यामध्ये सर्वात खात्रीशीर गुंतवणूक म्हणजे पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक असते.पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम या छोट्या बचतीतून खात्रीशीर कमाई करून देण्यासाठी अतिशय उत्तम आहेत.

Post Office monthly income scheme

आज आपण अशाच एक सुपरहिट योजनेबद्दल माहिती बघणार आहोत ज्यामध्ये एकदाच पैसे गुंतवल्यानंतर दर महिन्याला आपल्याला खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते या योजनेलाच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम असे म्हणतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये व्यक्तिगत किंवा जॉईन खाते सुद्धा उघडता येते.

एमआयएस खात्यात एकदाच गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत खाते उघडल्यानंतर पुढील पाच वर्षासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागते एक ऑक्टोबर 2023 पासून 7.4% वार्षिक व्याजदराने आपल्याला परतावा मिळत असेल आहे.

हे पण वाचा ~  Investment management : मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवेत? 'या' ठिकाणी करा गुंतवणूक, १५ वर्षांत मिळेल लाखो रुपये ...

आता मासिक उत्पन्न कसे ठरवले जाते?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये ९ लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये जमा करू शकता.

आपल्याला जर मूळ रक्कम पाच वर्षाच्या मॅच्युरियन नंतर काढायचे असल्यास आपण काढू शकतो, किंवा पुढे पाच पाच वर्षाच्या कालावधीसाठी सदरील रक्कम गुंतवू शकतो. खात्यावर आपल्याला या रकमेवरील व्याज दरमहा मिळत असते.

जर तुम्ही ५ लाख रुपये जमा केले असतील, या स्कीमनुसार यावर ७.४ % वार्षिक व्याज दिलं जातं. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ३,०८३ रुपयांचं उत्त्पन्न मिळेल. एक वर्षात ही रक्कम ३६,९९६ रुपये असेल.डिपॉझिटच्या तारखेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यातील रक्कम काढू शकता.

Leave a Comment