Post office RD : आपण जर RD मध्ये गुंतवणूक एकदा सुरू केली, तर तुम्हाला सलग 5 वर्षे दरमहा ठराविक रकमेचा हप्ता भरावा लागेल.आपण यातून मुदतपूर्तीपूर्वी रक्कम काढू शकत नाही.खाते उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर तुम्ही ते कधीही बंद करू शकता.तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार त्यावर व्याज दिले जाते.
Post office RD scheme
सरकारने पोस्ट ऑफिस आरडीवर ऑक्टोबर-डिसेंबरसाठी 6.7 टक्के व्याज ठेवले आहे. ही एक प्रकारची पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये तुम्ही किमान 100 रुपये गुंतवू शकता. ही योजना तुम्हाला किमान पाच वर्षे चालवावी लागेल.
RD Interest Rates
मिञांनो सध्या खालील बँका पोस्ट ऑफिस RD पेक्षा कमी व्याज दर देत आहेत.काही बँका अशा आहेत. त्या सर्व बँका पोस्ट ऑफिसपेक्षा 5 वर्षांच्या आरडीवर कमी व्याज देतात.पाहुयात अशा बँकांची यादी.
- यस बँक – 6.50 टक्के
- एसबीआई – 6.50 टक्के
- इंडियन ओवरसीज बँक – 6.50 टक्के
- डीबीएस बँक – 6.50 टक्के
- इंडसइंड बँक – 6.50 टक्के
- साउथ इंडियन बँक – 5.65 टक्के
- यूनियन बँक ऑफ इंडिया़ – 5.60 टक्के
- बंधन बँक – 5.60 टक्के
- करुर वैश्य बँक – 5.35 टक्के
- पंजाब नॅशनल बँक – 5.30 टक्के
- आईडीबीआई बँक – 5.25 टक्के
- बँक ऑफ महाराष्ट्र – 5.25 टक्के
- बँक ऑफ इंडिया – 5.25 टक्के
- कोटक महिंद्रा बँक – 5.20 टक्के
- सिटी बँक – 3.00 टक्के