Close Visit Mhshetkari

RBI Credit card New Rules : बापरे.. RBI च्या नवीन नियमामुळे डेबिट, क्रेडिट कार्डचा वापरामध्ये होणार मोठ बदल!

RBI New update : डेबिट आणि क्रेडिट किंवा या दोन्हींपैकी एक कार्ड जरी तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, आता याच कार्ड्सच्या वापरासंदर्भातील एक मोठी  समोर आली आहे. थोडक्यात सांगावं तर आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुम्ही कुठंही वापरू शकणार आहात. 

 नेटवर्कही निवडता येणार

कार्डदात्या बँकेकडून कार्डधारक अनेक कार्ड नेटवर्कपैकी कोणताही एक पर्याय निवडण्यास सांगण्यात येईल. ज्यानंतर ग्राहकांना कार्डचा वापर करता येईल. शासनाच्या या नव्या योजनेमुळं रुपे कार्डचाही वापर वाढवण्याचा आरबीआयचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाकडून सहसा कार्डची सुविधा पुवण्यात येते. पण, त्यांच्या नेटवर्कमध्ये रुपे कार्डचा समावेश मात्र नसतो त्यामुळंच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. 

आरबीआयने का घेतला हा निर्णय ?

कार्ड वापरून तुम्ही सहजतेने कोणत्याही व्यापाऱ्याला पैसे देऊ शकता. 

कार्ड नेटवर्क व्यापारी आणि कार्डधारक यांच्यातील व्यवहार सुलभ करते. कार्ड नेटवर्क एक प्रकारची पायाभूत सुविधा प्रदान करते, ज्यासाठी शुल्कही आकारते.

एखाद्या विशिष्ट कार्ड नेटवर्क कंपन्यांबद्दल बोलायचे तर मास्टरकार्ड, व्हिसा, अमेरिकन एक्सप्रेस आणि डिस्कव्हर, हे चार मुख्य क्रेडिट कार्ड नेटवर्क आहेत. यापैकी Amex आणि डिस्कव्हरी या दोन कंपन्या कार्ड जारी करणाऱ्याही आहेत. जेव्हा तुम्ही कार्डने पेमेंट करता तेव्हा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट कुठे करता येईल, हे कार्ड नेटवर्क ठरवते. 

हे पण वाचा ~  RBI Rules : क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरत असाल तर सावधान! RBI चे बदललेले नियम! जाणून घ्या नाहीतर होईल अडचण

रुपे कार्डला प्रोत्साहन 

क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाबाबतचे नियम बदलले तर त्याचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम रुपे कार्डवर दिसून येईल. देशात रुपे कार्डाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक हा निर्णय घेत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकन व्हिसा आणि मास्टरकार्डवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या कार्ड नेटवर्कमध्ये RuPay कार्ड एंट्री नाही.

क्रेडिट कार्ड बंद होऊ शकत.

आरबीआयनं असंही निर्देश दिले आहेत की, जर एखाद्या व्यक्तीनं एक वर्ष क्रेडिट कार्डचा सतत वापर केला नाही तर अशा परिस्थितीत बँक त्यांचे कार्ड बंद करू शकते. परंतु, असं करण्यापूर्वी बँक ग्राहकाला माहिती देईल. मेसेज पाठवल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहक प्रतिसाद देत नसेल किंवा कार्ड वापरत नसेल, तर अशा स्थितीत बँक ग्राहकांचं क्रेडिट कार्ड बंद करू शकते. 

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment