Close Visit Mhshetkari

Arrears Bills : वेतन आयोग थकित हप्ता, वैद्यकिय प्रतिपूर्ती बील व फरक बील अदा होणार! निधी प्राप्त …

Arrears Bills : सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या महिन्याच्या वेतन व भत्ते, निवृत्तीवेतना मध्ये उपलब्ध करुन दिलेली आहे.

सदरील परिपत्रकानुसार ही रक्कम फक्त सातव्या वेतन आयोगाचा ३ रा हप्ता व ४ था हप्तासाठी, तसेच वैद्याकीय देयके,थकीत देयके अदा करण्यासाठी उपब्धत करुन देण्यात आली आहे.

Medical and Arrears Bills Budget

आता लेखाशिर्ष २२०२०१७३/०४ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद सातव्या वेतन आयोगाचा ४ था व अशंराशीकरण, उपदानासाठी अदा करावयाची आहे. उपरोक्त बाबीशिवाय इतर बाबींवर खर्च करण्यात येणार नाही.

सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने ४ था हप्ता, व अशंराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात आली आहे.

सदरील खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आले आहे.

हे पण वाचा ~  Salary Budget Arrears : मोठी बातमी ... या कर्मचाराऱ्यांच्या धकीत वेतनासाठी निधी वितरित ! शासन निर्णय निर्गमित ...

अनुदान अदा करण्यासाठी सूचना

ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे.त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.

वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे लागणार आहे.वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही.

जिल्हानिहाय देयक मंजूर यादी येथे पहा

Medical bill

सदरील मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई- मेलवर देण्यात आलेली आहे.

Leave a Comment