Close Visit Mhshetkari

Pay Scale Arrears : खुशखबर … या राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित वेतन स्तर ! शासन निर्णय निर्गमित

Pay Scale Arrears : वित्त विभागाने ३० जानेवारी, २०१९ रोजीच्या अधिसूचनेअन्वये सुधारीत वेतन संरचना व वेतननिश्चितीचे नियम लागू केले होते.परंतु वित्त विभागाने खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना सदरील वेतन सुधारणा लागू केल्या नव्हत्या.

सुधारीत वेतनस्तर लागू होणार !

आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थाव्दारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आदिवासी प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील अधिक्षक व अधिक्षिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिका क्र.६३६३/२०१८ दाखल केली होती. यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने आदेश दिला होता.

आता मा. उच्च न्यायालयाचा आदेश व वित्त विभाग, परिपत्रक दिनांक २०.०२.२०१९ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या सूचना विचारात घेऊन आवश्यक त्या फेरफारास राज्य वेतन सुधारणा समिती-२०१७ च्या शिफारशींवरील निर्णयाच्या अधीन राहून अधिक्षक व अधिक्षिका यांना दिनांक ०१ जानेवारी, २०१६ पासून सुधारीत वेतनस्तर लागू करण्यात आला आहे.

राज्य वेतन सुधारणा समिती अहवाल २०१७

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ अन्वये शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालाच्या खंड-२ मधील शिफारशी संदर्भात निर्णय घेतले आहेत. 

हे पण वाचा ~  Bakshi Samiti : राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवाल खंड-२ मधील शिफारशी व वेतननिश्चिती संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित ....

राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करुन ज्या संवर्गाना सुधारीत वेतन स्तर मंजूर केलेले आहेत अशा संवर्गाची माहिती सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे.

सदरील शासन निर्णयामधील विवरणपत्र-अ मध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमधील अधिक्षक (पुरुष) व अधिक्षक (महिला) या सवंर्गाच्या वेतनस्तरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील कर्मचारी हे राज्य शासकीय कर्मचारी नाहीत. त्यामुळे सदर कर्मचान्यांना शासनाचे कोणतेही नियम, अधिनियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक थेट लागू होत नाही.

सदर निर्णय लागू करावयाचे झाल्यास आदिवासी विकास विभागामार्फत स्वंतत्र आदेश काढुन सदर बाबी अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येतात.

आदिवासी विकास विभाग सुधारीत वेतनस्तर

वित्त विभाग, शासन निर्णय क्र. वेपूर. ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ मधील सुधारीत वेतनस्तर (विवरणपत्र-अ) आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील अधिक्षक (पुरुष) व अधिक्षक (महिला) या सवंर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या लागू करण्यात आली आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Pay Scale Arrears : खुशखबर … या राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित वेतन स्तर ! शासन निर्णय निर्गमित”

  1. Shikshak adhikshakanche manmane pagar aani tech kam kantati swarupat karnare khedya vastivar ahoratr shram dan karnare Gadchiroli jilyatil Shyaskiy Adivasi Ashram school var RabRabnare Shikshak Ani etar kantrati karmacharyani Potala purel evdhahi mandhan Nahiy aani Wede var Sudha midat nahi.Laj watayla pahije Yethil vyavasthela.

    Reply

Leave a Comment